कल्याण: कल्याणच्या राजकारणात नेहमीच श्रेयवाद सुरू असतो, अनेकदा, तू-तू, मेै-मेै ही कल्याणात नेहमीची झालेली आहे. मात्र श्रेयवाद घेण्यापेक्षा लोकांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी जर पुढाकार घेतला तर ते लोकांना जास्त आवडेल असे मत केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी व्यक्त केले आहे. तसेच पाटील यांनी सांगितले की कल्याण-डोंबिवलीमध्ये (Kalyan-Dombivali) आज ज्या नागरिक सुविधा असायला हव्या होत्या, त्या यापूर्वी झाल्या नाहीत असेही सांगितले. शहाड येथे पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे लोकार्पण केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. (Union Minister of State for Panchayat Kapil Patil's own party?)
हे देखील पहा -
कल्याण-डोंबिवलीत शिवसेना,(Shivsena) भाजप(BJP) आणि मनसे (MNS) मध्ये नेहमीच विकास कामावरून (Development works) श्रेयवाद रंगला आहे. अनेक वेळेला कामे होण्याआधीच श्रेयवाद होताना दिसतो. दरम्यान केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण-डोंबिवली मधील नेत्यांच्या श्रेयवादारून टोला हाणला आहे. पाटील म्हणाले की, डोंबिवली किंवा कल्याणात आज ज्या काही नागरी सुविधा असायला पाहिजे होत्या त्या यापूर्वी झालेल्या नाहीत. आता सर्वच जण श्रेय घेत असतील तर लोकांना समाधान वाटेल असे लवकरात लवकर काम सुरू केल्यास जनता तुम्हाला दुवा देईल. जनतेला माहिती आहे कोण काम करतंय आणि कोण नाही, असे पाटील म्हणाले.
कल्याण-डोंबिवली पालिकेत गेले अनेक वर्षे शिवसेना-भाजप सत्ता राहीली आहे. गेल्या टर्मला तर केंद्रात आणि राज्यात भाजप-सेनेची सत्ता होती. गेल्या टर्ममध्ये कल्याण-डोंबिवलीत दोन खासदार आहेत एक शिवसेनेचा आणि एक भाजपचा. स्वतः कपिल पाटील यांच्याकडे कल्याण पश्चिम, टिटवाळा हा परिसर येतो. तर उर्वरित खा. शिंदे यांच्याकडे येतो. तर गेल्या टर्ममध्ये भाजप आणि शिवसेनेचे चार आमदार होते. त्यात भाजपचे तीन, शिवसेनाचा एक. गेल्या टर्ममध्ये दोन मंत्री पदं होती, पालकमंत्री शिवसेनेचे, राज्यमंत्री भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण होते. तर पालिकेत पण सत्ता शिवसेना-भाजपची होती. 40 च्या वर भाजप नगरसेवक होते, उपमहापौर सभापती पद भाजपकडे होते, असे असूनही विकास झाला नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की डोंबिवली किंवा कल्याणात आज ज्या काही नागरी सुविधा असायला पाहिजे होत्या त्या यापूर्वी झालेल्या नाहीत. म्हणजे एक प्रकारे आपल्याच पक्षातील नेत्यांना घराचा आहेर दिला असे म्हणावे लागेल.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.