सुशांत सावंत
Narayan Rane News In Marathi : शिंदे सरकारच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिंदे गटाचा राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून शिंदे गट आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडूनही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं जात आहे. याचदरम्यान भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नारायण राणे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल सुरूच आहे. नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले,'गणरायाची कृपा आहे की, ठाकरे यांचे सरकार गेले आहे. घरात बसून मुख्यमंत्रिपद हाताळता येत नाही. ठाकरे सरकार गणरायाच्या कृपेने गेले आणि शिंदे गट-भाजपचे सरकार आले. राज्य विकासाकडे वाटचाल करेल. सरकार गेले म्हणजे त्यांचा आवाज गेला'.
नारायण राणे पुढे म्हणाले, 'शिंदे गटाकडे ४० आमदार गेले आहेत. आता उरलेले लवकरच जातील. ठाकरेंचे अस्तित्व राहिलेले नाही. शिवसेना संपलेली आहे. शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेंचा.
आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांची जवळीक देखील वाढले आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे युती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावर भाष्य करताना नारायण म्हणाले, 'भाजप आणि मनसे युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील'.
शिवसेनेकडून शिंदे गटाला गद्दार संबोधले जात आहे. त्यावरही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. 'उद्धव ठाकरे यांनी गद्दारी करून मुख्यमंत्रिपद मिळविले. खरे गद्दार उद्धव ठाकरे हे आहेत'. मुंबईतील मेट्रो प्रकल्पावर भाष्य करताना राणे म्हणाले, 'ठाकरे सरकारने मेट्रोचे काम आधी बंद केले. त्यांचा विकास हा फक्त पैसे मिळविण्यासाठी होता. शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे आता लोकांचा प्रवास सुखकर होईल'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.