Kapil patil News: जालना लाठीमार प्रकरणावरून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचं विरोधकांवर टीकास्त्र; म्हणाले,'जे लोक कधीही...

Kapil patil on Maratha andolan: विरोधकांच्या टीकेवर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भाष्य केलं आहे.
Kapil patil News
Kapil patil NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख

kapil Patil News in Marathi

जालन्यातील लाठीमार प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांच्या टीकेवर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भाष्य केलं आहे.

(Latest Marathi News)

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री म्हणाले, 'जालन्यात घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. त्याचे राजकारण कोणीही करू नये. जे लोक कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे कधीही बोलले नाहीत. असे लोक तिकडे जायला लागले आहेत'.

Kapil patil News
Maratha Andolan: 'आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या', गिरीश महाजनांची आंदोलकांना विनंती

'मराठा समाजाबाबत भारतीय जनता पक्षाच्या अतिशय सकारात्मक भावना आहेत. भाजप आंदोलकांच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पक्षाने कधीही मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही'.

Kapil patil News
Maratha Andolan: मोठी बातमी! अजित पवार आपल्या आमदारांसह घेणार जालन्यात मराठा आंदोलनकर्त्यांची भेट, सूत्रांची माहिती

'आतापर्यंत मराठा मुख्यमंत्री झाले, त्यांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवल होतं. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भाजपने केलेले भरीव काम जनतेच्या समोर आहे. भारतीय जनता पक्ष त्याला कधीही विरोध करणार नाही, असे ते म्हणाले .

'मराठा समाजातील गरीब लोकांना आरक्षण मिळाले पाहिजेत. ही भावना सगळ्यांची होती. मराठा समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी आरक्षण दिले आणि टिकवले. मात्र दुर्दैवाने ते कोर्टाने रद्द केले, असे ते पुढे म्हणाले.

Kapil patil News
Talathi Recruitment Exam 2023: जालन्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद, सोमवारची तलाठी भरती परीक्षा पुढे ढकलण्याची काँग्रेसची मागणी; विद्यार्थ्यांपुढं मोठं आव्हान?

'मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे, हे निश्चितपणे यात काही तरी मार्ग काढतील, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com