बेरोजगारीने तरुणाईची गुन्हेगारीकडे वाटचाल!

बेरोजगारीने तरुणाई गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असल्याचे अनेक उदाहरणांतून समोर येत आहे. विशेष म्हणजे यात अल्पवयीन किंवा वयाची २१ वर्षेही न ओलांडलेल्या तरुणांची संख्या जास्त आहे.
बेरोजगारीने तरुणाईची गुन्हेगारीकडे वाटचाल!
बेरोजगारीने तरुणाईची गुन्हेगारीकडे वाटचाल!SaamTv
Published On

चेतन इंगळे

वसई / विरार : लॉकडाऊनमधल्या बेरोजगारीने तरुणाई गुन्हेगारी प्रवृत्तीकडॆ वळत असल्याचे समोर आले आहे. हाताला काम नसल्याने पोटाची भूक मिटविण्यासाठी एका 18 वर्षीय आरोपीने धावत्या लोकलमधील प्रवाशाच्या गळ्याला ब्लेड लावून धाकाने प्रवाशाकडून पैसे उकळले आहेत. Unemployment leads youth to crime!

हे देखील पहा -

प्रवाशाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीला अटक केली आहे. अरबाज खान असे त्याचे नाव आहे. ४ जुलै रोजी विरार रेल्वे स्थानकातुन चढलेल्या या आरोपीने विरार-नालासोपारा रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या लोकलमध्ये जबरी चोरीचा प्रयत्न केला.

बेरोजगारीने तरुणाईची गुन्हेगारीकडे वाटचाल!
लसींच्या वाढीव पुरवठ्याबाबद केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेणार - राजेश टोपे

संबंधित प्रवाशाला ब्लेड चा धाक दाखवून त्याकडे असलेले १२० रुपये त्याने लुटले व पसार झाला होता. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध घेत या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीवर या आधी कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नसून पोटाची भूक मिटविण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com