Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये १४ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; नागरिकांमध्ये दहशत

Ulhasnagar Stray Dag Attack : उल्हासनगरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. एका मुलावर सहा ते सात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे.
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam Digital

Ulhasnagar News

मुंबई आणि परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली. या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा जीवही गेला आहे. दरम्यान उल्हासनगरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. एका मुलावर सहा ते सात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. बुद्ध कृपा बिल्डिंगजवळील आवारात राहणाऱ्या प्रदीप तिवारी यांचा १४ वर्षीय मुलगा अर्पित या हल्यात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक येथील बुद्ध कृपा बिल्डिंगजवळील आवारात राहणाऱ्या प्रदीप तिवारी यांचा १४ वर्षीय मुलगा अर्पित हा सकाळी दुधाची पिशवी घेऊन घरातून दूध घेण्यासाठी बाहेर पडला. त्यानंतर त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला, तो खाली पडला आणि कुत्रे त्याला चावू लागले आणि ओरबाडू लागले. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी त्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याच्यावर मुलावर सुरू आहेत. अर्पित तिवारीच्या आधी अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांबाबत महापालिकेने योग्य ती पावले उचलावीत, असे आवाहन नागरिकांनी केले आहे.

Ulhasnagar News
Aamshya Padvi Joins Shinde Group : ठाकरे गटाला मोठा धक्का; आमदार आमश्या पाडवींचा शिंदे गटात प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com