Uddhav Thackeray News: ...तर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी राजीनामे द्यावेत: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर घणाघात करत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News Saam Tv
Published On

गिरीश कांबळे

Uddhav Thackeray News In Marathi

जालना लाठीमार हल्ला प्रकरणावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. या प्रकरणावर महायुती सरकारच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भाष्य केलं. यावेळी विरोधकांच्या आरोपांचं खंडण केलं. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर घणाघात करत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालना लाठीमार प्रकरणावर भाष्य केलं. ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारच्या आरोपांना उत्तर दिलं. ठाकरे म्हणाले,'अजित पवार यांना समजूतदार समजत होतो. मी संघनायक होतो. मी चुकत होतो, तेव्हा हे विकेट किपर काय करत होते?'. (Uddhav thackeray Latest News In Marathi)

Uddhav Thackeray News
CM Shinde on Maratha Andolan : जालन्यात चुकीच्या पद्धतीने ज्या केसेस दाखल झाल्यात त्या मागे घेतल्या जातील : मुख्यमंत्री

'आता जालन्यात जी डोकी फोडलीत, त्याचं श्रेय टीमवर्क म्हणून घ्यावं. मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागत होतो. आता तर एक फुल दोन हाफ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

'बारसूमध्ये लाठीचार्ज करण्यात आला. वारकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला. हे निर्घृण सरकार आहे. फडणवीस यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री शिंदे म्हणत आहे की, आम्ही लाठीचार्ज केला नाही. तुम्ही लाठीचार्ज केला नाही, तिथं कोण आलं. एवढा साळसूदपणा कशाला आणता,अशी टीका शिंदे यांनी केली .

Uddhav Thackeray News
PM Modi News : नरेंद्र मोदींनी ९ वर्षांत किती सुट्ट्या घेतल्या? माहिती अधिकारातून चकीत करणारी माहिती उघड

वटहुकूमावरून देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना ठाकरे म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांचं ज्ञान खूप तोकडं आहे. वटहुकूम केंद्र काढतं. मंत्रालयाच्या आजूबाजूला देखील फडणवीस यांनी फिरू नये. त्यांचं ज्ञान खूप तोकडं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com