रुपाली बडवे -
मुंबई : संजय राऊत हे वारंवार छत्रपती घराण्याबाबत चुकीची वक्तव्य करत असतात, त्यांनी या आधीही छत्रपती उदयनराजेंबाबत (UdayanRaje Bhosale) चुकीचं वक्तव्य केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तुम्ही आहात, राजकारण करत आहात, ज्यांमुळे खासदारकी, मुख्यमंत्रीपद मिळालं त्यांचे उपकार विसरु नका. छत्रपती घरण्यापेक्षा उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेना मोठी नाही हे विसरु नये, असा हल्लाबोल मराठा नेते आबासाहेब पाटील यांनी शिवसेनेवर केला आहे. (Uddhav Thackeray, Sanjay Raut and Shivsena)
'कोल्हापूरचे संजय पवार हे कट्टर शिवसैनिक आहेत, तसेच ते मावळे देखील आहेत आणि मावळे असतात त्यामुळे राजे असतात, राजे मोठे होतात.' शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातील मराठा संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा नेते आबासाहेब पाटील (Maratha leader Abasaheb Patil) यांनी देखील संजय राऊतावर टीका केली आहे.
हे देखील पाहा -
ते म्हणाले, छत्रपतींच्या नावावर शिवसेना चालते हे हे विसरू नका. याच नावावर संजय राऊतांना खासदारकी मिळाली आहे. त्यांनी छत्रपती घराण्याबाबात बोलू नये. चर्चेसाठी बोलवता आणि शिवबंधन बांधण्याचा घाट घालता. छत्रपती घराण्याला मानणारा मोठा समाज असून छत्रपती घराण्याबाबत अपशब्द काढला तर, मराठी क्रांती ठोक मोर्चा तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील यावेळी आबासाहेब पाटलांनी संजय राऊतांना दिला आहे.
पाटील पुढे म्हणाले, ज्या शिवरायांमुळे तुमची खासदारकी, मुख्यमंत्रीपद आहे त्यांनी उपकार विसरु नये. छत्रपती घरण्यापेक्षा उद्धव ठाकरे संजय राऊत शिवसेना मोठी नाहीत असंही ते म्हणाले.
दरम्यान, छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी देखील शिवसेनेवर टिका केली आहे. छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) यांच्या नेतृत्वाचा विश्वासघात केला असून, शरद पवार यांनी नांदेडच्या सभेत सर्व मतं देण्याचं जाहीर सांगितलं होतं. उद्धव ठाकरे, आणि वाचाळवीर नेते संजय राऊत यांनी ड्राफ्ट तयार केला, अजूनही वेळ गेली नाही. उद्धव ठाकरे पुरस्कृत करण्यास सकारात्मक होते. संजय राऊत यांनी हे पाप केलं आहे. शिवसेनेला येत्या निवडणुकीत धडा शिकविणार असल्याचा इशारा देखील जाधव यांनी दिला.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.