भूषण शिंदे -
मुंबई : 'कोल्हापूरचे संजय पवार हे कट्टर शिवसैनिक आहेत, तसेच ते मावळे देखील आहेत आणि मावळे असतात त्यामुळे राजे असतात.' असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीराजे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून आता नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यामध्ये चर्चा सुरु होत्या. मात्र, राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेवार म्हणून उभे राहण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी केला. तर शिवसेनेत प्रवेश केल्यावरच आपण राजेंना उमेदवारी जाहीर करू अशी भूमिका शिवसेने घेतल्यामुळे हा पेच सुटला नाही.
पाहा व्हिडीओ -
तसंच,काल माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेची उद्या शिट्टी वाजेल,आम्ही निरोपाची वाट बघत नाही. राज्यसभेच्या २ जागा शिवसेना लढवणार आणी जिंकणारच असल्याचं वक्तव्य करत संभाजी राजेंना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. दरम्यान, आज शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी कोल्हापूरच्या (Kolhapur) संजय पवार यांना दिल्याचं जाहीर केलं.
दरम्यान, संभाजी पवारांच्या याच उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, 'कोल्हापूरचे संजय पवार हे कट्टर शिवसैनिक आहेत, तसेच ते मावळे देखील आहेत आणि मावळे असतात त्यामुळे राजे असतात, राजे मोठे होतात. संजय पवार यांचे नाव नक्की झाले आहे. मात्र अधिकृत घोषण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करतील.' असं राऊत म्हणाले.
तसंच आम्ही राजघराण्याचा आदरच करतो. आतापर्यंत अनेक राजघराण्याच्या वंशजांनी विविध पक्षांच्या तिकिटावर निवडणुका लढवल्या आहेत. आजही ते लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आहेत असही राऊत म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.