Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आदेश

Uddhav Thackeray : विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटासोबत तर त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटासोबत आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV

सचिन गाड

Mumbai News: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना आतापासूनच तयारी सुरु केला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटापुढे अनेक मतदारसंघात तगडा उमेदवार शोधणं मोठ आव्हान असणार आहे. मात्र मुंबईत शिवसेनेनं (ठाकरे गट) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांत आपला उमेदवार जवळपास निश्चित केला आहे.

ठाकरे गट उत्तर पश्चिम मतदारसंघात गजानन कीर्तिकरांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांना बळ देण्याच्या तयारीत आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये अमोल कीर्तीकारांना साथ द्या! असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन शिबीरात केलं आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics: भाजप आमदार नारायण कुचेंवर गुन्हा दाखल करा; शिवसेना नेत्याचं थेट शिंदे-फडणवीसांना पत्र

जोगेश्वरी, अंधेरी, दिंडोशी, गोरेगाव विभागातील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी निर्देश दिल्याचं बोललं जात आहे. विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटासोबत तर त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटासोबत आहेत. (Breaking Marathi News)

मुंबईत महापालिकेत आपलाच महापौर बसणार

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आपली ताकद वाढवा असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. भाजप पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी करत आहे. गाफील राहू नका. भाजप नेते म्हणत आहेत महापौर बसवणार. पण ते कितीही म्हणाले तरी मुंबईत महापालिकेत आपलाच महापौर बसणार, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political News)

Uddhav Thackeray
Kalyan Crime News: गाडी पार्किंगवरुन दोन गटात तुफान राडा, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबतचा संभ्रम दूर करा

तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर झालेला या संबंधीचा संभ्रम दूर करा आणि तयारीला लागा. जोगेश्वरी अंधेरी दिंडोशी गोरेगाव विभागातील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी हे मार्गदर्शन केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com