Kalyan Crime News: गाडी पार्किंगवरुन दोन गटात तुफान राडा, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Kalyan Crime News: खडकपाडा पोलिसांनी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam TV

अभिजीत देशमुख

Kalyan News : कल्याणमध्ये पार्किंगच्या वादातून जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. हॉटेलसमोर गाडी पार्किंगच्या वादातून सोसायटीच्या वॉचमन आणि हॉटेल कर्मचारी यांच्यात जोरदार हाणामारी झाली आहे. खडकपाडा परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात मिंगयांग हे हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाजूला दोन मोठ्या सोसायट्या आहेत. हॉटेलसमोर गाडी पार्क केली तर सोसयटीच्या लोकांना याचा त्रास होतो. एका सोसायटीच्या वॉचमन नवीन थापा याच्या हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत गाडी पार्किंग करण्यावरुन नेहमी वाद होतो.

Kalyan Crime News
Crime News: महिला डॉक्टरचा भयंकर कारनामा, नर्सिंग होममध्येच मांडला बाळांच्या खरेदी विक्रीचा बाजार; उल्हासनगरातील धक्कादायक घटना

ग्राहक नेहमी हॉटेलसमोर गाडी पार्क करतात. त्यामुळे सोसायटीतील लोकांना त्रास होतो. सोसायटीतील नागरिक वॉचमनला ओरडतात. बुधवारी संघ्याकाळी याच कारणावरुन सोसायटीचा वॉचमन नवीन थापा आणि हॉटेल कर्मचारी अनिरुद्ध पोफाली यांच्या वाद झाला.  (Latest Breaking News)

या वादानंतर अनिरुद्ध पोफालीने 10 ते 12 कर्मचाऱ्यांसोबत वाचमन नवीन थापा याला मारहाण केली. यानंतर नवीन थापा याने देखील आवाज राय नावाच्या हॉटेलच्या एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. (Crime News)

Kalyan Crime News
Crime News : फॅमिली डॉक्टर बनला 'देवमाणूस'; राज्य हादरवणारा, मुख्यमंत्री ते राष्ट्रपतींपर्यत पोहचलेला खून खटला

या प्रकरणी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राड्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com