Kirit Somaiya News: किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओनंतर ठाकरे आक्रमक; राज्यातील विविध भागात शिवसैनिकांचं जोरदार आंदोलन

Kirit Somaiya News: महिला शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन, पोस्टर पायदळी तुडवत आंदोलन केलं आहे.
Kirit Somaiya News
Kirit Somaiya Newssaam tv
Published On

Kirit Somaiya News: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे . किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील विविधी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन पुकारले आहे. तर काही ठिकाणी महिला शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन, पोस्टर पायदळी तुडवत आंदोलन केलं आहे. (Latest Marathi News)

राज्यातील विविध भागात किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग चार आणि पाच युवती सेनेच्या वतीने सोमय्या यांच्या विरोधात निदर्शन आंदोलन केलं आहे.

Kirit Somaiya News
Bacchu Kadu On Ministership: बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला, त्यामागचं कारणही केलं स्पष्ट

किरीट सोमय्या यांच्या विरोधात भरपावसात शेकडो शिवसैनिक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तर कल्याणमध्येही सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे.

तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आरसा आंदोलन करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या सोलापूर जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अकलूज येथे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला शेण लावून जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांची भाजपमधून हकालपट्टी करावी अशी मागणी ही करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेनंतर भाजप काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल.

Kirit Somaiya News
PM Modi & Yogi Adityanath Death Threat: पीएम मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना पुन्हा धमकी, मेसेज येताच पोलीस यंत्रणा सतर्क

व्हिडिओ व्हायरल प्रकरणी सोमय्या यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात किरीट सोमय्या यांनी कथित व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केला नसून या प्रकरणाची चौकशी करून सत्यता तपासावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com