Uddhav Thackeray News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवस करायला आणि फेडायला दिल्लीत जातात. आजचा दिवस पार पडला म्हणून दिल्लीत जातात. त्यानंतर दुसरा दिवस पार पाडण्यासाठीही पुन्हा दिल्लीत जातात', अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. (Latest Marathi News)
महाविकास आघाडीने १७ डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या महामोर्च्याच्या निमित्ताने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, 'आमचा हल्लाबोल हा महाराष्ट्रद्रोहींच्या विरोधात आहे. परवा बैठक धावपळीत झाली. आज, बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आहेत. १७ तारखेचा हल्लाबोल हा महाराष्ट्रद्रोहींच्या विरोधात होईल'.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'न भूतो न भविष्यती' हा मोर्चा होणार आहे. महाराष्ट्राचे भविष्य नाकारण्यात येत आहे'. गुजरात निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता गुजरातमध्ये भाजप जिंकली आहे. गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातील उद्योगांचे योगदान आहे'.
कन्नड रक्षण वेदिके संघटनेने संजय राऊत यांना धमकी दिली. त्यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, 'कन्नड रक्षण वेदिके संघटना ही उघड उघड आमच्या संजय राऊत यांना धमक्या देतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलले, त्यानंतर संजय राऊत यांना धमकी आल्या. आणि आम्ही संयम बाळगायचा? एक तरी नवस बेळगाव देवाला बोलायला तिथं जावं'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.