मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेतून बंडखोरांची हकालपट्टी करण्याचं सत्र सुरुच आहे. सोमवारी हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची हकालपट्टी करण्यात आली होती. आता मंगळवारी रवींद्र फाटक यांची देखील शिवसेनेतून (Shivsena) हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे. (Shivsena Latest News)
रवींद्र फाटक यांच्यासोबत राजेश शहा यांचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल 40 शिवसेना आमदारांनी बंड केलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता या बंडखोर आमदारांवर हळहळू कारवाई करण्याचा बडगा सुरू आहे. बंड केलेल्या आमदारांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून दररोज एक-एक पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली जात आहे. यामध्ये मंगळवारी आणखी एका बंडखोराची भर पडली.
शिवसेनेकडून शिंदे गटातील बंडखोर आमदार रवींद्र फाटक यांची पालघर जिल्हासंपर्क प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शाह यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. (Mla Ravindra Phatak News)
पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती सामनाच्या अग्रलेखातून तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.
दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आता बैठकांचा जोर वाढवला आहे. खासदार, जिल्हा प्रमुख आणि स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका उद्धव ठाकरेंनी घेत आहेत. स्थानिक पातळीवरील नेतृत्त्वात बदल करण्यात आले आहेत. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांकरता शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर करण्यात आली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.