मुंबई महापालिकेसाठी भाजप लागली कामाला; शिवसेनेच्या जागा रडारवर

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्तेचा राजकीय फायदा घेऊन जिंकण्याचा मानस भाजपचा आहे.
shivsena and bjp
shivsena and bjp saam tv
Published On

सुमित सावंत

मुंबई : शिंदे गटाच्या बंडाळीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडली आहे. तर ठाणे,नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीमधील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली आहे. त्यात मुंबईतील माजी नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीत सत्तेचा राजकीय फायदा घेऊन जिंकण्याचा मानस (BJP) भाजपचा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ( Mumbai BJP News In Marathi )

shivsena and bjp
उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात जाणार

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारून त्यांच्या जागा येनकेन प्रकारे आपल्या ताब्यात घेण्याची रणनीती भाजपने आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सत्तेचा वापर आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुरेपूर करून देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवायचा निर्धार भाजपच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक माजी नगरसेवकाने आपल्या मतदार संघात व आजूबाजूच्या मतदार संघात जास्तीत जास्त काम करावे व मेहनत घ्यायची तयारी करावी, असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांना दिल्याचे सूत्रांकडून समजते.

मुंबई महापालिकेवर दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. २०१७ साली राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता होती. पण तरीही शिवसेना-भाजपने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवली. अनेक वर्षांपासून शिवसेनेचं मुंबई महापालिकेवर वर्चस्व आहे. मात्र, शिंदे गटाच्या बंडखोरीनं शिवसेनेपुढे मोठं राजकीय संकट उभं ठाकलं आहे.

त्यामुळे या बंडाळीचा आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेवर काय परिणाम होणार आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार का, या साऱ्या प्रश्नांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या बंडाळीचा फायदा भाजपला होईल का, याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

shivsena and bjp
सध्या माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही, पण...; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना भावनिक साद

शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात जाणार

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जवळपास ४० आमदार शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरे सरकार कोसळले होते. शिवसेनेतील ही बंडाळी थांबण्याची चिन्हे नाहीत. आमदारानंतर आता खासदारही शिंदे गटात जाणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का आहे. तत्पूर्वी, काही खासदारांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com