Mumbai News: फिरायला गेले अन् खदानीत बुडाले; एकाचा मृतदेह सापडला तर दुसरा बेपत्ता, दहिसर पूर्वेकडील घटना

Youths Drowned In Quarry : दहिसर पूर्वेकडील हनुमान टेकडी येथील खदानीत दोन तरूण बुडाले आहेत. एका तरूणाचा मृतदेह सापडला आहे.
Youths Drowned In Quarry
Youths Drowned In Quarry Saam Tv

Youths Drowned In Quarry Water At Dahisar East

मुंबईच्या दहिसर पूर्वेकडील हनुमान टेकडी येथील खदानीतील पाण्यात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू (Youths Drowned In Quarry Water) आहे. यापैकी एका तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. (Latest Marathi News)

अग्निशमन दलाच्या जवानांनी या तरुणाचा मृतदेह काढला बाहेर (Quarry Water At Hanuman Hill Dahisar East) आहे. तर या खदानित बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. मनोज रामचंद्र सुर्वे (45 वर्ष) असं मृत तरुणाचं नाव आहे. तर चिंतामण वारंग या तरुणाचा अद्याप शोध सुरू आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दहिसर पूर्वेकडील हनुमान टेकडी येथील खदानीत हे दोन तरूण बुडाले आहेत. एका तरूणाचा मृतदेह सापडला आहे, तर दुसरा अद्यापही बेपत्ता आहे. बेपत्ता तरूणाचा शोध घेतला जात (Hanuman Hill Dahisar East) आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. काल सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास ही घटना घडली आहे. हे तरूण फिरण्यासाठी खदानीवर गेल्याची माहिती मिळत आहे.

तरूणांना खदानीच्या परिसरात फिरायला गेल्यानंतर ते बुडाल्याची घटना घडली आहे.त्यांना फिरायला जाणं महागात पडलं आहे. या दोन तरूणांपैकी एका तरूणाचा मृतदेह सापडला आहे. दहिसर पूर्वेकडील परिसरात ही घटना (Mumbai News) घडली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

Youths Drowned In Quarry
Young Man Drowns : UPSC ची तयारी करणाऱ्या इंजिनीअर तरुणाचा बुडून मृत्यू, मैत्रिणीच्या कुत्र्याला वाचवायला उतरला होता धरणात

अमरावतीतील घटना

अमरावतीत दोन विद्यार्थी तलावात बुडाल्याची घटना घडली होता.अमरावती शहरातील छत्री तलावात ही घटना घडली (Drowned) होती. ही घटना 4 मार्च रोजी घडल्याचं समोर आलं होतं. हे दोन विद्यार्थी छत्री तलावाजवळ फिरायला गेले होते.या विद्यार्थ्यांचा तोल गेला अन् ते दोघेही तलावात बुडाले होते.

अमरावतीमधील छत्री तलावात बुडालेल्या एका विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आलं होत.तर एका विद्यार्थ्याचा शोध सुरु होता. शेवाळ असल्यामुळे हे विद्यार्थी तलावात अडकून पडले होते. रेस्क्यु टीमच्या साहाय्याने घटनास्थळी बचावकार्य सुरू होतं.

Youths Drowned In Quarry
Youth Drown in Raigad : धबधब्यावर फिरायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, महाडमधील घावर कुंड येथील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com