Thane Accident: दोन ऑईल कंटेनर पलटले; सुदैवाने जीवितहानी नाही

Two oil container Accident in Thane : या अपघातात दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Two oil container Accident in Thane
Two oil container Accident in Thaneविकास काटे
Published On

ठाणे: ठाण्यातील (Thane) घोडबंदर रोड येथे आज पहाटेच्या सुमारास गाय मुख्य गावाजवळ दोन कंटेनर्सचा अपघात (Accident) झाला. दोन्ही कंटेनर चालकांचा ताबा सुटून हा अपघात झाला होता. या अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र ऑईल सांडले होते, यामुळे काही प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस याठिकाणी दाखल झाले. त्यानंतर हे दोन्ही कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. (Two oil containers overturned in Thane; Fortunately no casualties)

हे देखील पाहा -

Two oil container Accident in Thane
Bhandara: बिअर बारमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; हल्लेखोर स्वतःच पोहोचले पोलीस ठाण्यात

मिळालेल्या माहितीनुसार एक कंटेनर ठाण्याहून घोडबंदरकडे तर दुसरा कंटेनर घोडबंदरहून ठाण्याकडे येत होता. दोन्ही टँकर रस्त्याच्या बाजूला करण्यात आले आहेत. वाहने घसरु नये म्हणून रस्त्यावर माती टाकण्यात आली आहे. या अपघातात दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. (Two oil container Accident in Thane)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com