VIDEO: पुण्यात ससून रुग्णालयाच्या गेटवर दोन गँग एकमेकांशी भिडल्या; चाकू, कोयत्यांनी एकमेकांवर हल्ला

पुण्यात ससून रुग्णालयामध्ये दोन शिकलगरी गॅंग एकमेकांशी भिडल्या.
Pune News
Pune NewsSaam Tv
Published On

>> सचिन जाधव

पुणे : पुण्यातील गुंडाची दहशत कमी होण्याचं नाव नाही. पुण्यात गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे सर्वसामान्य पुणेकर दहशतीत आहेत. आज पुण्यातील ससून रुग्णालयाच्या गेटवरच दोन गँग एकमेकांशी भिडल्या. कोयते, चाकू, धारदार शस्त्राने दोन्ही बाजूंनी गुंडांनी एकमेकांवर हल्ला चढवला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात ससून रुग्णालयामध्ये दोन शिकलगरी गॅंग एकमेकांशी भिडल्या. यावेळी त्यांनी एकमेकांवर कोयता व चाकूने हल्ला चढवला. काही महिला देखील एकमेकांसोबत हाणामारी करत असताना व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत आहे. त्यानंतर अचानक काही गुंड येतात आणि एकमेकांवर हल्ला चढवतात. रुग्णालयाच्या गेटवर सुरक्षा रक्षक उभे असताना देखील गुंडानी हैदोस घातला. (Latest News Update)

Pune News
CCTV Footage: धावत्या रेल्वेतून खाली पडणाऱ्या महिलेचे RPF जवानाने वाचवले प्राण, पाहा घटनेचा थरारक VIDEO

आधी एका गुन्ह्यात शिकलगरी टोळीअंतर्गत वाद झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर हडपसर पोलिसांनी मेडिकलसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपींना ससून रुग्णालयात पाठवलं होतं. त्यावेळी ससून हॉस्पिटलमध्ये या दोन टोळ्या एकमेकांना भिडल्या. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतलं आहे.अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com