एम्पोटेरेसिन-बी इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या एम्पोटेरेसिन-बी या इंजेक्शनची मूळ किंमतीपेक्षा जास्त रुपयांना विक्री करणाऱ्या दोघा आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी अटक केलीय आहे.
एम्पोटेरेसिन-बी इंजेक्शनचा काळाबाजार

एम्पोटेरेसिन-बी इंजेक्शनचा काळाबाजार

vikas kate 

Published On

विकास काटे

ठाणे : कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असताना आपण पाहिलं आहे. मात्र, आता नव्या म्युकरमायकोसिस या आजारावर परिणामकारक असलेल्या इंजेक्शनचा देखील काळाबाजार होत असल्याचे चित्र समोर आले आहे. Two arrested for Blackmarketing of Amphotericin B

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या एम्पोटेरेसिन-बी या इंजेक्शनची मूळ किंमतीपेक्षा जास्त रुपयांना विक्री करणाऱ्या दोघा आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी अटक केलीय आहे. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणण्यात आलेले आणलेले चौदा इंजेक्शन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सदरची कारवाई कापूरबावडी पोलीस स्टेशन आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाकडून करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

म्युकरमायकोसिससाठी उपयुक्त असलेल्या इंजेक्शनची मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे घेऊन विक्री करण्यात येत असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांना प्राप्त झाली. कापूरबावडी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकासोबत कापूरबावडी येथे एम्पोटेरेसिन-बी इंजेक्शन घेऊन आलेल्या आरोपी अमरदीप सोनवणे आणि आरोपी निखिल संतोष पवार यांना अटक केली.

<div class="paragraphs"><p>एम्पोटेरेसिन-बी इंजेक्शनचा काळाबाजार</p></div>
बुलेट चालवताय मग ही बातमी नक्कीच वाचा...

एम्पोटेरेसिन-बी या एका इंजेक्शनची मूळ किंमत ७ हजार ८१६ रुपये असून हे दोन्ही आरोपी सदर एक इंजेक्शन १० हजार ५०० रुपयांना विकत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 14 इंजेक्शन हस्तगत केले आहेत. या संपूर्ण रॅकेट मध्ये अजून कोणी समाविष्ट आहे का याचा कापूरबावडी पोलीस तपस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com