Pune : आदिवासी भागात सुविधांची वाणवा, गरोदर महिला ८ तासांपासून रुग्णालयात उपचाराच्या प्रतीक्षेत

पालघर जिल्ह्यात गरोदर महिलेच्या जुळ्या बालकांचा वैद्यकीय सेवे्भावी मृत्यू झाल्याच्या घटनेचे पदसाड पावसाळी अधिवेशनात उमटत असताना पुण्यातही (Pune) असाच प्रकार घडताना दिसत आहे.
pune news
pune newssaam tv
Published On

Pune News : पालघर जिल्ह्यात गरोदर महिलेच्या जुळ्या बालकांचा वैद्यकीय सेवे्भावी मृत्यू झाल्याच्या घटनेचे पदसाड पावसाळी अधिवेशनात उमटत असताना पुण्यातही (Pune) असाच प्रकार घडताना दिसत आहे. पुण्याच्या भिमाशंकर परिसरातील नायफड गावातील गरोदर आदिवासी महिला प्रसृती अभावी रुग्णालयाच्या पायऱ्यावरच बसून आहे. त्यामुळे उपचाराभावी महिलेची प्रकृती बिघडत आहे. हा सारा प्रकार चांडोली ग्रामीण रुग्णालयात घडला आहे. त्यामुळे राज्यात आदिवासी गर्भवती महिलांची हेळसांड सुरूच असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.

pune news
PM मोदींनंतर देवेंद्र फडणवीस सक्षम नेतृत्व; खासदारकी देण्याची ब्राह्मण महासंघाची मागणी

भिमाशंकर परिसरातील नायफड गावची गरोदर आदिवासी महिला प्रसृतीसाठी चांडोली ग्रामीण रुग्णालात आली होती. मात्र, गरोदर महिलेला प्रसृती अभावी रुग्णालयाच्या पायऱ्यावर बसून राहावं लागलं आहे. तब्बल आठ तासापासून महिला चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या पायऱ्यावर उपाशीपोटी पायऱ्यावर बसली आहे. सदर गरोदर महिला आदिवासी भागात उपचार मिळत नसल्याने चांडोली रुग्णालयात आली होती. मात्र, सदर महिलेची रुग्णालयात आल्यानंतर तिची हेळसांड होत असल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे. महिलेला प्रसृतीच्या कळा येत असताना उपचाराअभावी महिलेला रुग्णालयाच्या सेवेची वाट पाहावी लागत आहे.

pune news
MNS Banner: डोंबिवलीतील ‘तो’ मनसेचा बॅनर ठरतोय लक्षवेधी

दरम्यान, गरोदर महिलेला रुग्णालयात उपचार मिळत नसल्यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडत आहे. त्यात उपचारासाठी महिला रुग्णालयाच्या पायऱ्यावरच बसून आहे. मात्र, चांडोली ग्रामीण रुग्णालयात प्रशासनाकडूनच अजूनही दखल घेण्यात आलेली नाही. तर चक्क चांडोली ग्रामीण रुग्णालयाकडून पुढील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे राज्यात आदिवासी गरोदर महिलांच्या जीवांचा खेळ सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com