

पुण्यामध्ये अवकाळी पावसाने घेतला पहिला बळी
सिंहगड रोडवर अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू
अनेक भागात झाडे पडली आणि पाणी साचले
पावसामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले
पुण्याला सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसाने पुण्यात पहिला बळी घेतला. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंहगड रोडवर झाड कोसळले. पु. ल देशपांडे उद्यानाजवळील नवश्या मारुती मंदिराजवळील ही घटना घडली. झाड कोसळून तिघेजण अडकले होते. यामधील एका महिलेचा झाडाखाली दबून मृत्यू झाला तर दोघांचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले. रंजना नवनाथ गिरी असे मृत महिलेचे नाव होते.
पुण्यात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील बालाजीनगर, सिंहगड रोड, हडपसर येथील अमरनगरी येथे झाडे पडल्याच्या घटना घडल्या. सिंहगड रोडवर पडलेल्या झाडामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. गेल्या तीन तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील गंगाधाम चौकात होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नसून होर्डिंगचे मोठं नुकसान झालं आहे.
पुणे शहर आणि उपनगरात दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. ती तास पुण्यात तुफान पाऊस झाला. आता पावसाचा जोर कमी झाला. पण या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. अनेक ठिकाणी पावसामुळे तळं साचलं. पुणे शहरात झालेल्या पावसामुळे बैठ्या घरांमध्ये पाणी शिरले. बालाजीनगरमधील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. या पावसामुळे बालाजीनगरमधील घरांचे मोठे नुकसान झाले.
पुण्यातील उत्तमनगर परिसराला मुसळधार पावसामुळे अनेक गाड्या आणि रिक्षा पाण्याखाली गेल्या. कोंढवा बुद्रुकमधील रस्ते पाण्याखआली गेले. या पाण्यात अनेक चारचाकी वाहनं आणि रिक्षा अडकल्या. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर परिसरात देखील पाणी साचले. तर जंगली महाराज रस्त्याचे रुपांतर नदीमध्ये झाले. पुण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये तळ्याचे स्वरूप प्राप्त झाला असून अनेक गाड्या पाण्यामध्ये बुडाल्या आहेत. तर शासकीय विश्रामगृहाच्या रूममध्ये पाणी शिरले. मॉडर्न कॉलेजजवळील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.