Tomato Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; टोमॅटोचे दर आणखी वाढणार, कारण काय?

Tomato Price Hike: पुढील काळात हाच टोमॅटो अधिकच महाग होणार असल्याची शक्यता निर्माण होणार आहे. यामुळे टोमॅटो स्वयंपाक घरात दुर्मिळ होणार आहे.
Tomato
TomatoSaam TV

tomato price hike: टोमॅटोचे बाजारभाव गगनाला भिडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याचदरम्यान कृषी विभागाच्या अहवालानुसार टोमॅटोची लागवड 70 टक्क्यांनी घटली आहे. यामुळे पुढील काळात हाच टोमॅटो अधिकच महाग होणार असल्याची शक्यता निर्माण होणार आहे. यामुळे टोमॅटो स्वयंपाक घरात दुर्मिळ होणार आहे. (Latest Marathi News)

टोमॅटोचे आगार म्हणून जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यात तिन्ही हंगामात 3 हजार 500 हेक्टरवर टोमॅटोची लागवड होऊन टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेतलं जात होतं. मात्र मागच्या पाच वर्षापासून टोमॅटो हब म्हणून ओळख असलेल्या या उत्तर पुणे जिल्ह्यात टोमॅटोवरील विविध रोगराईने टोमॅटोला ग्रासलं आहे.

Tomato
Mumbai BEST Worker Protest: 'तात्काळ कामावर रुजू व्हा अन्यथा...', संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना कंपनीकडून नोटीस

रोगराईमुळे टोमॅटोचे उत्पादन घटल्याने लागवडही कमी होऊ लागली आहे. त्यातच यंदाच्या वर्षी उन्हाळी हंगामात टोमॅटोच्या बागांना प्लास्टिक व्हायरसने ग्रासल्याने उभ्या बाग उपटून टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे टोमॅटोचे लागवड क्षेत्र घटल्याने उत्पादन 70 टक्क्यांनी कमी घटल्याने बाजारभाव गगणाला भिडले आहेत.

टोमॅटोवर विविध रोगाची लागण होत असताना बियाणं आणि रोपवाटिकेतील रोपं याचं शासकीय आणि खासगी पातळी परिक्षण व्हायला हवं होतं. मात्र, झालं नसल्याची खंत शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. तर शासकीय आधिकारी यांनी टोमॅटोवर नव्याने संशोधन व्हायला हवं, असं मत व्यक्त केलं आहे.

टोमॅटोची लागवड आकडेवारी पाहुयात..

राज्यात 40 हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड अपेक्षित ..! मात्र यंदा 21 हजार 581 हेक्टरवर लागवड दिसून येते...

नाशिक : 11123. हेक्टर

पुणे : 3978 हेक्टर

लातूर : 2676 हेक्टर

छत्रपती संभाजीनगर : 2378 हेक्टर

अमरावती : 650 हेक्टर

कोल्हापूर : 404 हेक्टर

नागपूर : 283 हेक्टर

मागच्या चार वर्षापासुन जुन्नर परिसरात टोमँटोवर नवनवीन रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतोय. वाढीव उत्पादनासाठी रासायनिक खते आणि औषधांचा अमर्याद वापर होतोय, यातून जमिनीचा पोतही बिघडत असल्याने पिकांची फेरपालट होणं अपेक्षित असताना शेतकरी याकडे दुर्लक्ष करतोय.

उन्हाळी टोमॅटो जानेवारी ते जुलै या महिन्यात संरक्षित सिंचन स्त्रोतांवर घेतला जातो. जुलैनंतर बाजारपेठेत येतो. पण यंदा लवकर पिकणे, पिवळ्या रंगाचे आणि फळांमध्ये विकृती आढळून येत असल्याने शेतकऱ्यांना उभा टोमँटोच्या बागा उपटून टाकण्याची वेळ येणार असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Tomato
Ashish Shelar News: 'तुमचं सर्व गेलं आहे; त्याची चिंता करा...' PM मोदींवरील टीकेवरुन आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

टोमॅटोचे लागवड क्षेत्र घटत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे टोमँटोच्या उत्पादन क्षमता स्थिर ठेवण्यासाठी टोमँटोवर खाजगी आणि शासकिय पातळीवर तातडीने सक्षम संशोधन होण्याची गरज आहे. अन्यथा आजच्या टोमँटोचे बाजारभाव पुन्हा गगणाला भिडणार असल्याचे भीती व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com