weather report today : मुंबईत होळीच्या‌ दिवशी पावसाची बरसात; हवा बिघडलेलीच! कसं आहे उपनगरांतलं हवामान?

५ ते ७ मार्च दरम्यान राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
Mumbai Update
Mumbai UpdateSaam Tv

weather report : राज्यात पुढचे काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार काल बुलढाणा आणि नंदूरबारमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मोठी धांदळ उडाली. अवकाळी पावसामुळे पिकं धोक्यात येण्याची शक्याता आहे. (Latest Weather Alert News)

आज रविवारी मुंबईत देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण ठाण्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तडपत्या उन्हात आज पाऊस पडल्यास मुंबईकर सुखावतील. विदर्भात देखील आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

Mumbai Update
Weather Updates : ऐन उन्हाळ्यात बरसणार पावसाच्या सरी; येत्या २४ तासांत या भागात अवकाळी पावसाचा अंदाज

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काल शनिवारी बुलढाण्यात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे वातावरण थंड झाले होते. मात्र याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात सर्वत्र रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर गावांमध्ये अनेकांनी पिकांवर औषध फवारणीला सुरूवात केली आहे. ५ ते ७ मार्च दरम्यान राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Mumbai Update
Weather Update: काळजी घ्या! उन्हानं होरपळ, ११ ते ४ चं ऊन त्रासदायक, का होतेय तापमानात वाढ?

कुठे होणार गारपीट

पश्चिम चक्रवाताचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहू लागलेत.त्यामुळे गारपीट तसेच पावसाच्या सरी कोसळणार असं हवामान विभाने म्हटलं आहे. महाराष्ट्रात ठाणे, रायगड, विदर्भ तसेच पालघर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळू शकतो. ७ मार्च रोजी विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळेल तर ८ मार्च रोजी गारपीट होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रविवारी नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा तसेच चंद्रपूर येथे हलक्या सरी कोसळतील. ६ मार्चपर्यंत येथे ढगाळ वातावरण कायम राहणार असून तुरळक पाऊस पडणार आहे. शेतात सध्या द्राक्ष काढणीला आलेत. मात्र पाऊस आल्यामुळे द्राक्षांवर किड पडण्याची शक्यता आहे. औरंगाबाद आणि जालना या ठिकाणी ८ मार्चपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. आज रविवार असल्याने मुंबईकर फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे असे हवामान खात्याने सांगितले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com