मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदामुळे (Maharashtra Bandh) राजकारण (Politics) सुरु असतानाच कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant INC) आणि भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar BJP) हे मात्र एकमेकांवर ट्वविटरवर टीका (Twitter War) करत आहेत. भातखळकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच राहुल गांधी दिसतात तर सावंत यांना भातखळकरांमध्ये सुखीलाल दिसतोय. होय हे आम्ही म्हणत नाहीय, तर स्वतः हे दोघं नेते म्हणतायत. (Tiv-tiv in Congress-BJP; Sachin Sawant and Bhatkhalkar taunt each other on Twitter)
हे देखील पहा -
त्याचं झालं असं, की लखीमपुर प्रकरणाचा (Lakhimpur Kheri) विरोध करत असताना कॉंग्रेस खासदार प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उत्तर प्रदेश सरकारनं अटक केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर भारताच्या पुर्व पंतप्रधान स्वर्गीय इंदीरा गांधी (Indira Gandhi) यांची तुलना प्रियंका गांधी यांच्यासोबत केली. शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनाही ''प्रियंका गांधींमध्ये इंदीरा गांधींची झलक दिसते असं ट्विट केलं होत.'' या ट्विटचाच आधार घेत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी "उध्दवजींमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे..." असा टोमणा ट्विटरवर मारला.
आता भातखळकरांच्या ह्याच ट्विटचा समाचार घेतला तो कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी... त्यांनीही भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची तुलना चक्क मदर इंडिया (Mother India) या चित्रपटातील सुखीलाल या पात्राशी केली, एवढंच नाही तर त्यांनी एडिट केलेला फोटोही ट्विट करत त्याला कॅप्शन दिलं की, "आणि भातखळकरांच्या आचार आणि विचारांमध्ये "मदर इंडिया"मधील सुखीलालाची झलक दिसू लागली आहे, त्याचे काय?"
यावर एका यूजरने कमेंट केलीय की, "सुखीलाला कपटी आणि खुप लालची होता!" तर दुसऱ्या युजरने लिहीलं "कोण कोणासारखं दिसते ते जाऊ द्या, देशमुख आणि परम सिंग कुठं आहे ते सांगा" अशा अनेक गंमतीशीर कमेंट्स लोकं करतायत.
या दोन्ही नेत्यांच्या ट्विटर वॉरमध्ये शांत बसतील ते कार्यकर्ते कसले? दोन्हीकडचे कार्यकर्ते एकमेकांवर हात धूवून कमेंट्स करतायत. त्यामुळे ट्विटरवर सुरु असलेली राजकीय टिव-टिव आणि टोमणेबाजीमुळे इतरांचं मात्र चांगलंच मनोरंजन (Entertainment) होतंय. या दोन्ही नेत्यांच्या टोमणेबाजीमुळे ''महाराष्ट्र बंद'' हा विषय यांच्यापुरता बाजूला झाल्याचंच दिसतंय.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.