आज अधिवेशनामध्ये 'या' मुद्यांवरती होणार चर्चा; वाचा सविस्तर

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter session) आज दुसरा दिवस असून, आज विभागाच्या भरती घोटाळ्या रून विरोधक आक्रमक होणार आहेत.
आज अधिवेशनामध्ये 'या' मुद्यांवरती होणार चर्चा; वाचा सविस्तर
आज अधिवेशनामध्ये 'या' मुद्यांवरती होणार चर्चा; वाचा सविस्तरSaam Tv
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter session) आज दुसरा दिवस असून, आज टीईटी, म्हाडा, आरोग्य विभागाच्या भरती घोटाल्यावरून विरोधक आक्रमक होणार आहेत. याचसोबत अतिवृष्टीचा कोकण आणि विदर्भाला फटका बसला. मात्र आजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीय. यावरून देखील विरोधक सरकारला घेरण्याची चिन्हे आहेत.

आज अधिवेशनामध्ये 'या' मुद्यांवरती होणार चर्चा; वाचा सविस्तर
शिवसेना आमदाराला मतदान केंद्रात प्रवेश देणं पोलिसांच्या अंगलट; चौघांच निलंबन

विधानसभेत मुंबई महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar) यांच्या विषयी भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलेले विधान यावरून कारवाई मागणी करणारी लक्षवेधी सेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी टाकली तर भाजपा आमदार अमित साटम यांनी कोव्हीड काळात नगर मिरा भाईंदर भंडारा येथे रूग्णालय आग लागून मृत्यू घटना घडल्या याची लक्षवेधी विशेष आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) आज सभागृहात भरती घोटाळा संदर्भात मोठा खुलासा करणार असल्याची माहिती समजते.

हे देखील पहा -

लोकलेखा समितीचा अहवाल ही आज मांडला जाणार. विधानसभा अध्यक्ष निवडणूक पद्धत आवाजी मतदानाने करण्याच्या संदर्भात सूचना हरकती नेमक्या काय दिल्या जातात याकडे लक्ष असून सादर केलेल्या पुरवण्या मागणी यावर ही आज चर्चा होइल. आज अनेक विधेयक सभागृहात मांडली जाणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com