मुंबई: कार्डिलीया क्रुज प्रकरणी २ ऑक्टोबरपासून तुरुंगात असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आज जामीनावर तुरुंगाबाहेर येणार आहे. मात्र आर्यनला जामीन देण्यासाठी विशेष न्यायालयाने १४ अटी ठेवल्या आहेत. त्या अटींचे पालन न केल्यास आर्यनचा जामीन रद्द होऊन तो पुन्हा तुरुंगात जाऊ शकतो. (then Aryan khan can be imprisoned again!)
हे देखील पहा -
आर्यन खानला कालच जामीन मिळाला होता, मात्र रिलीज ऑर्डच्या प्रक्रियेला उशीर झाल्याने कालची रात्रही त्याला तुरुंगात काढावी लागली. जवळपास २८ दिवसांनी आर्यन आज दुपारी १२ पर्यंत तुरुंगातून बाहेर येणार आहे. मात्र बाहेर आल्यावरही त्याला न्यायालयाच्या अटींच पालन करावं लागणार आहे. ड्रग्स प्रकरणातील चौकशी प्रभावित होऊ नये, चौकशीत अडथळे येऊ नये म्हणून न्यायालयाने या अटी घातल्या आहेत.
तुरुंगाबाहेर पडल्यानंतर आर्यनला देश सोडता येणार नाही, त्याला आपलं पासपोर्ट विशेष न्यायालयाकडे सुपुर्द करावं लागेल. आर्यनला माध्यमांशी बोलता येणार नाही किंवा सोशल मीडिया वापरता येणार नाही. त्याला दर शुक्रवारी एनसीबीच्या मुंबई कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी दोनच्या दरम्यान हजेरी लावावी लागेल. या प्रकरणातील कोणत्याही आरोपींशी किंवा साक्षीदारांशीही त्याला बोलता येणार नाही. मुंबईच्या बाहेर जाण्याअगोदर त्याला एनसीबीची परवानगी घ्यावी लागेल, माहिती द्यावी लागेल. एनसीबी बोलवेल तेव्हा हजर राहून तपासात सहकार्य कराव लागेल. तसे न केल्यास एनसीबी आर्यनचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेऊ शकते. त्यामुळे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरही आर्यनला सावधगिरीनं रहावं लागेल. अन्यथा न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाल्यास त्याला पुन्हा तुरुंगवारी होऊ शकते.
सध्या आर्यनच्या स्वागतासाठी स्वतः त्याचे वडिल शाहरुख खान हे आर्थर रोड परिसरात दाखल झाले आहेत. शाहरुखसोबत त्याची कायदेशीर सल्लागार टीमही उपस्थित आहे. सुटकेची प्रक्रिया सुरु झाली असून आर्यन आज दुपारी १२ वाजेपर्यंत तुरुंगाबाहेर येऊ शकतो. तोपर्यंत शाहरुख आपल्या टीमसह एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला आहे. मन्नतबाहेरही त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी जमली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.