'गडकरी रंगायतन'ची तिसरी घंटा वाजणारच नाही - आ. डावखरे

ठाणे महापालिकेच्या 'लेट लतीफ' कारभारामुळे गडकरी रंगायतनमध्ये नाटकाची २२ ऑक्टोबरला तिसरी घंटा वाजणारच नाही, अशी टीका भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.
'गडकरी रंगायतन'ची तिसरी घंटा वाजणारच नाही - आ. डावखरे
'गडकरी रंगायतन'ची तिसरी घंटा वाजणारच नाही - आ. डावखरेSaam Tv News
Published On

ठाणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मराठी नाट्यप्रेमींकडून नाट्यगृहे उघडण्याची वाट पाहिली जात असतानाच, ठाणे महापालिकेच्या 'लेट लतीफ' कारभारामुळे गडकरी रंगायतनमध्ये नाटकाची २२ ऑक्टोबरला तिसरी घंटा वाजणारच नाही, अशी टीका भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली आहे. (The third bell of 'Gadkari Rangaitan' will not ring - said MLA Niranjan Davkhare)

हे देखील पहा -

राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर २२ ऑक्टोबरपासून राज्यातील नाट्यगृहे व मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे मराठी नाट्यरसिकांना पुन्हा नाटक पाहण्याची ओढ निर्माण झाली आहे. ठाणे शहराचे सांस्कृतिक प्रतीक म्हणून गडकरी रंगायतनची ओळख आहे. ठाणेकरांची नाटक पाहण्यासाठी पहिली पसंती गडकरी रंगायतनलाच असते. मात्र, आता नाट्यगृह सुरू होत असतानाच गडकरी रंगायतनचा पडदा महिनाभर उघडणार नाही व तिसरी घंटाही  वाजणार नाही. ठाणे महापालिकेने गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम काढले असून, ते आणखी महिनाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांबरोबरच रसिकांना नाटकालाही मुकावे लागेल.

'गडकरी रंगायतन'ची तिसरी घंटा वाजणारच नाही - आ. डावखरे
कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम, उदय सामंत यांची माहिती

यापूर्वी नाट्यगृहे बंद असताना महापालिकेने दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची अपेक्षा होती. मात्र, आता नाट्यगृह सुरू होण्यापूर्वी गडकरी रंगायतनची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेच्या या कारभाराचा उगागच नाट्यरसिकांना फटका बसणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी मराठी माणूस व मराठी संस्कृतीच्या पोकळ गप्पा मारत मारतात. मात्र, त्यांना मराठी नाट्य रसिकांविषयी आस्था नसल्याचेच या प्रकारातून उघड झाले आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com