डोंबिवली : डोंबिवली विष्णूनगर पोलीसांनी एका सराईत मोबाईल चोरास अटक केली आहे. या भुरट्या चोरावर आधीही मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चाळीतील घरांना लक्ष करून तो घरातील मोबाईल चोरून पसार व्हायचा. चोरलेला फोन बंद न करता त्यावर कोणी कॉल किव्हा व्हिडिओ कॉल केला तर 'मै हूं डॉन' असे बोलून तो चॅलेंज देत नागरिकांना घाबरवत होता. आता या 'डॉन'च्या मुसक्या आवळत विष्णुनगर पोलिसांनी त्याला सोमवारी अटक केली आहे आणि अटक होताच डॉन थरथर कापू लागला. (The thief was saying that "I am Don" but he got scared when he was arrested by the police)
हे देखील पहा -
डोंबिवली पश्चिममधील कोपर भागातील एका चाळीमध्ये काही नागरिकांचे फोन चोरीला गेले होते. त्यांनी याबाबतची माहिती विष्णूनगर पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी त्वरित माहिती घेत गुन्हा दाखल केला आणि सदर चोरचा तपास चालू केला. विष्णूनगरचे प्रभारी वपोनी राहुल खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे, बी.के. सांगळे व पथक यांनी तांत्रिक विश्लेषणच्या मदतीने व गुप्त बातमीच्या मार्फत शोध चालू केला.
दरम्यान पोलीस सांगळे यांचे सतीश सोबत एकदा व्हिडिओ कॉलवर बोलणे देखील झाले, तेव्हाही त्याने 'मै हूं डॉन', 'डॉन को पकडना मुमकीन नही' हेच चॅलेंज पोलिसांनाही दिले. तेव्हा त्याच्या कॉल वरून तांत्रिक बाबीद्वारे शोध घेतला असता तो वाशीम येथे असल्याचे दाखवत होते. मात्र भांडुप येथे पुन्हा तो चोरीच्या उद्देशाने येताच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार विष्णुनगर पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री अटक केली.
अटक होताच डॉन थरथर कापू लागला. त्याच्याकडून 6 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपीस कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.