Pune News: अवैध काम रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की, कोंढव्यातील धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं?

Pune Latest News: या प्रकरणात धक्काबुक्की करणाऱ्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kondhwa Police Station
Kondhwa Police StationSaamtv
Published On: 

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune News Update: जनावरांची कत्तल रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना जमावाकडून धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील कोंढवा भाग परिसरात ही घटना घडली असून धक्काबुक्की करणाऱ्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात दाखल करण्यात आला आहे. (Pune Latest Crime News)

Kondhwa Police Station
Maharashtra Politics: कर्नाटक विजयानंतर 'मविआ' तयारीला! अजित पवारांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला; प्रत्येक पक्षातील...

याबाबत अधिक माहिती अशी की, कोंढवा (Kondhava) परिसरातील मिठानगर भागात पत्राच्या शेडमध्ये पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसताना जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेले. (Latest Marathi News)

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच कारवाईला विरोध करण्यासाठी १० ते १५ लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवला. त्यानंतर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांनाच धमकी दिल्याचाही प्रकार केला.

Kondhwa Police Station
Jalna News: घाणेवाडी जलाशयात केवळ ११ टक्केच पाणीसाठा; जालन्यात उद्‌भवणार पाणीटंचाईच्या झळा

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी घटनास्थळावरुन पोलिसांनी अंदाजे 20 ते 25 किलो मास, मास कटिंगचे लोखंडी सामग्री आणि इतर साहित्य जप्त केले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Pune Police)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com