राजकीय पुढाऱ्यांना लैंगिकतेबद्दल अभ्यास करण्याची गरज; का होतीये मागणी वाचा

''ज्या गोष्टी कधी सिद्ध करता येणार नाही, अशा गोष्टींचा या विधेयकामध्ये समावेश आहे. समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य म्हणून नियुक्त करणार का?''
राजकीय पुढाऱ्यांना लैंगिकतेबद्दल अभ्यास करण्याची गरज; का होतीये मागणी वाचा
राजकीय पुढाऱ्यांना लैंगिकतेबद्दल अभ्यास करण्याची गरज; का होतीये मागणी वाचा SaamTV
Published On

रामनाथ दवणे/ सुशांत सावंत

मुंबई : भाजप आमदार आणि माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. विद्यापीठ सुधारणा कायद्यांवर करत असलेल्या भाषणातील समलैंगिकता याबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. यात अभिनेत्री सोनम कपूर, रिचा चढ्ढा यांचा समावेश आहे. आपल्या राजकिय पुढाऱ्यांना लैंगिककेबद्दल अभ्यास करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधान सभेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) समलैंगिकांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केले होते.

''ज्या गोष्टी कधी सिद्ध करता येणार नाही, अशा गोष्टींचा या विधेयकामध्ये समावेश आहे. समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य म्हणून नियुक्त करणार का?'' असा सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केला होता. तसेच अलैंगिक संबंधाची परिभाषा सरकारने सांगितली नाही. तर तुम्ही जनावरासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना अलैंगिक व्यक्ती समजणार का? असे वादग्रस्त वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं.

दरम्यान विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी 'काळे विधेयक होळी आंदोलन ' करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्रदेश अध्यक्ष विक्रांत जी पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधेयकाची होळी करण्यात आली. हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून आता या पुढे या आंदोलनाची मालीका चालवली जाणार असल्याचा इशारा ही भाजप ने दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com