Har Har Mahadev: झी विरोधात आंदोलन चिघळणार! स्वराज्य संघटनेकडून २४ तासांचा अल्टिमेटम

स्वराज्य संघटनेने झी मराठी वाहिनी काहीही ऐकण्यास तयार नही हे पाहता थेट कार्यालयासमोर फोटोंची होळी केली.
Har Har Mahadev
Har Har Mahadevप्राची कुलकर्णी
Published On

Har Har Mahadev: हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद आणखीन चिघळला आहे. आज (१७ डिसेंबर) स्वराज्य संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी झी मराठी वाहिनीचे मुंबईमधील कार्यालय गाठत तिथे घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की त्यांनी ऑफिसची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस बंदोबस्त असल्याने तसे न करता झी मराठीच्या फोटोची होळी करण्यात आली. (Latest Marathi News)

हर हर महादेव हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या विळख्यात आहे. चित्रपट गृहात हा चित्रपट प्रदर्शित होऊ न दिल्याने आता टिव्हीवर चित्रपट दाखवण्याचा निर्णय झी वाहिनीने घेतला आहे. मात्र यासाठी स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. संभाजीराजे यांनी देखील या संदर्भात पत्रव्यवहार केला होता. हा चित्रपट झी वाहिनीवर प्रदर्शित करू नका अशा सूचना दिल्या होत्या.

Har Har Mahadev
Zee Marathi Awards: कलाकारांची अवॉर्डसची नॉमिनेशन पार्टी जोरात; खास थिमने सर्वांचेच लक्ष वेधले

झी मराठी आपल्या निर्णयावर ठाम

झी मराठी वाहिनीला निवेदन, पत्रव्यवहार करूनही या बाबत कोणताही निर्णय घेतल्याचे वाहिनीने जाहीर केलेले नाही. तसेत हर हर महादेव चित्रपटाची (Movie) जाहिरात अजूनही दाखवली जात आहे. रविवारी चित्रपट टिव्हीवर पाहता येईल असे जाहिरातीमध्ये सांगितले आहे. त्यामुळे आज स्वराज्य संघटना अधिक आक्रमक झाली.

Har Har Mahadev
Zee Talkies Comedy Awards: मराठमोळ्या अवॉर्ड कार्यक्रमाला दाक्षिणात्य चित्रपटातील गाण्यांचा तडका !

२४ तासांचा दिला अल्टिमेट

स्वराज्य संघटनेने झी मराठी वाहिनी काहीही ऐकण्यास तयार नही हे पाहता थेट कार्यालयासमोर फोटोंची होळी केली. झी मराठीला २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून झी ने माघार घेतली नाही तर राज्यभरात झी वाहिनी, कार्यालयांवर लक्ष करण्यात येईल आणि झी बॉयकॉट (Boycott) मोहीम सुरु करून झी विरोधात जनजागृती करण्यात येईल, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com