प्रेयसीला अद्दल घडविण्यासाठी कट रचून मजूराची हत्या; अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार

अनिताचा दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याचा संशय वामन याला होता. याच संशयातून त्याने अनिताला अद्दल घडवण्याच्या हेतूने तिला अडकवण्याचा कट रचला.
Crime
CrimeSaam TV

अंबरनाथ : अंबरनाथच्या (Ambernath) फॉरेस्ट नाका परिसरात राहणाऱ्या वामन मारुती शिंदे या ३९ वर्षीय इसमाचे त्याच परिसरात राहणाऱ्या अनिता काठे महीलेसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मागील वर्षी वामन हा एक गुन्ह्यात काही महिने नाशिक कारागृहात होता. या कालावधीत अनिताचा दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याचा संशय वामन याला होता. याच संशयातून त्याने अनिताला अद्दल घडवण्याच्या हेतूने तिला अडकवण्याचा कट रचला. त्यानुसार त्याने आधी अनिताला एका लॉजवर (Lodge) घेऊन जात तिच्याकडून तिचं मतदार ओळखपत्र घेतलं. त्यानंतर त्याने मुलीकडून अनिताच्या नावाने एक चिठ्ठी लिहून घेतली, ज्यात तिचा फोन नंबरही टाकला. यानंतर त्यानं ग्लोव्हज आणि एक चाकू विकत घेतला आणि त्या चाकूला धारही लावून आणली.

त्यानंतर त्यानं ३१ मार्च रोजी संध्याकाळी त्याने कल्याणला जाऊन अमित उर्फ आंडवा या मजुराला काहीतरी काम देण्याच्या बहाण्याने बदलापूरला आणलं. तिथून रिक्षाने गणपत ढाब्यासमोरील MIDC च्या मोकळ्या भूखंडावर तो त्याला घेऊन गेला आणि तिथे त्याने अमित याची चाकूने गळा चिरून हत्या केली. इतक्यावरच न थांबता त्यानं अनिताकडून घेतलेलं तिचं मतदान ओळखपत्र आणि मुलीकडून अनिताच्या नावाने लिहून घेतलेली चिठ्ठी अमित याच्या खिशात ठेवली आणि तिथून पळून गेला.

यानंतर आपल्यावर पोलिसांना संशय येऊ नये, म्हणून तो छातीत दुखत असल्याचा बहाणा करून एका खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखल झाला. दुसरीकडे १ एप्रिल रोजी सकाळी पोलिसांना (Police) अमित याचा मृतदेह आणि त्याच्या खिशात चिठ्ठी, अनिताचं मतदार ओळखपत्र आढळताच त्यांनी अनिताला ताब्यात घेतलं. मात्र तिने आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत आपण आपलं मतदार ओळखपत्र हे वामन शिंदे याला दिल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी वामन याला उचलून आणत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.

एखाद्या चित्रपटात किंवा क्राईम पेट्रोलमध्ये शोभावी, अशी ही हत्या करण्यात आली. यातून फक्त दुसऱ्या पुरुषाशी संबंध असल्याच्या संशयपोटी अनिताला अडकवणं इतकाच हेतू वामन शिंदे याचा होता. मात्र तिला अडकवण्याच्या नादात एका निष्पाप तरुणाचा बळी त्यानं घेतला आणि शेवटी स्वतःच्या जाळ्यात स्वतःच अडकला.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी वामन शिंदे याला काही तासात बेड्या ठोकल्या खऱ्या, मात्र त्याच्याकडून गुन्हा कसा आणि का केला? हे कबूल करून घेताना मात्र पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली. मात्र अखेर वामन याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याची रवानगी कोठडीत झाली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com