ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची "शरद शतम" नावाची योजना मांडणार- धनंजय मुंडे

आरोग्य तपासणी करणे, त्यांना "शरद शतम्‌" आरोग्य कवच विमा योजना कार्यान्वित करण्याकरिता राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली
ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची "शरद शतम" नावाची योजना मांडणार- धनंजय मुंडे
ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची "शरद शतम" नावाची योजना मांडणार- धनंजय मुंडे Saam Tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्यामध्ये ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षामधून किमान एकदा तरी आरोग्य तपासणी करणे, त्यांना "शरद शतम्‌" आरोग्य कवच विमा योजना कार्यान्वित करण्याकरिता राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

या समितीचे अध्यक्ष म्हणून, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल, एनयुएचएमचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, डीएमईआरचे उपसंचालक डॉ. अजय चांदनवाले, जे जे रुग्णालयातील डॉ. विनायक सावर्डेकर, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, ग्रामविकास विभागातील आस्थापना उपसचिव, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे आस्थापना उपसचिव हे या समितीमध्ये सदस्य म्हणून काम बघणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची "शरद शतम" नावाची योजना मांडणार- धनंजय मुंडे
Accident; बस- कंटेनरचा भीषण अपघात; जागीच 7 ठार, 13 जखमी

धनंजय मुंडे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांकरिता आवश्‍यक असलेल्या विविध वैद्यकीय चाचण्यांबाबत शिफारशी करणे, या योजनेंतर्गत आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करणेबाबत कार्यपद्धतीमध्ये शिफारस करणे, या योजनेत ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याबाबत अहवाल संबंधीत ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त होण्याबाबत आणि त्यात आजार आढळल्यास त्याचे निदान करणेबाबत राहणार आहे.

तसेच आरोग्य विभागाच्या आणि इतर योजनेमध्ये अभिसरण करण्याची कार्यपद्धतीबाबत शिफारस करणे, इत्यादी बाबींसह “शरद शतम्‌’ योजनेच्या एकूणच कार्यपद्धतीला निश्‍चित करण्याकरिता शिफारशी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या समितीवर नेमण्यात आलेली आहे. या समितीने ठराविक वेळेत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com