मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) बेमुदत उपोषणास बसले आहेत. दरम्यान काल रात्रीपासून त्यांची तब्येत खालावली असल्याने आज अखेर या उपोषणावरती महाविकास आघाडी सरकारने तोडगा काढला.
आज महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Uddhav Thackeray and Ajit Pawar) यांच्यासमवेत वर्षा बंगल्यावर बैठक घेतली या बैठकीनंतर आघाडी सरकारचे शिष्टमंडळ संभाजी राजे यांना भेटण्यासाठी आझाद मैदानावरती आले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील एकनाथ शिंदे आणि अमित देशमुख हे उपस्थित होते त्यावेळी संभाजी राजेंच्या (Sambhaji Raje) सरकारने मान्य मागण्या एकनाथ शिंदेनी वाचून दाखवल्या.
ते म्हणाले, 'मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण केलंत सर्वाना आपली काळजी आहे. कायदेशीर बाबी असतात त्यासाठी दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख , अजित दादा , मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यामध्ये जे सरकार देऊ शकतो त्याचा पाठपुरावा करत होतो.'
हे देखील पहा -
आरक्षणाचे जे फायदे इतर समाजाला दिलेत तेच मराठा समाजाला देणार असून आज आपल्या लढ्याला यश मिळालं आहे, आजचा दिवस हा विजयाचा दिवस असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे त्यांनी सांगितलं, सारथी संस्थेकडून संपुर्ण व्हिजन डॉक्य़ुमेंट ३० जूनपर्यंत पुर्ण करण्याचं आश्वासन दिलं तसंच संस्थेतील रिक्त पदे १५ मार्चपर्यंत सर्व पदे भरणार असल्याच त्यांनी घोषित केलं. सारथीची ८ उपकेंद्र स्थापणकरण्यासाठी देण्याचा प्रस्ताव १५ मार्च पर्यंत देणार, शिवाय अण्णासाहेब महामंडळाला अतिरिक्त १०० कोटी देण्यार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, मराठा आंदोलकांवरील (Maratha Agitators) दाखल गुन्हे मागे घेण्याबाबतच्या कारवाईबाबत गृहमंत्र्याकडून आढावा बैठक घेणार, ज्यांचा सहभाग नव्हता त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं. मराठा आंदोलनातील मृत व्यक्तींना शिष्टमंडळाने कागदपत्रांची पुर्तता करुन नोकरी देणार असल्याचही त्यांनी यावेळी जाहीर केलं.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.