Thane Shrinagar Police Station
Thane Shrinagar Police StationSaam TV

धक्कादायक! पोलीस ठाण्यातच महिला पोलिसाने संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?

सदरील घटना मंगळवारी (16 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास घडली.

Thane Srinagar Women Police : ठाणे (Thane) शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. श्रीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस (Police) कर्मचाऱ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्यातील महिला कक्षामध्येच जाऊन या महिला कर्मचाऱ्याने गळफास घेतला. सदरील घटना मंगळवारी (16 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास घडली. (Thane Todays News)

Thane Shrinagar Police Station
सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? अजितदादांनी शिंदे गटातील आमदारांना फटकारलं

पोलीस नाईक अनिता वाव्हळ असं आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. अनिता या श्रीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्या कर्तव्यावर आल्या होत्या. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांनी पोलीस ठाण्यातील महिला कक्षामध्ये जाऊन गळफास घेतला. (Thane Police Todays News)

Thane Shrinagar Police Station
थरारक! पुराच्या पाण्यात पिकअप गेली वाहून; चालकासह २ जण बुडाल्याचा अंदाज

गळफास घेतला तेव्हा महिला कक्षात कोणीही नव्हते. एक पोलीस कर्मचारी महिला कक्षात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वाव्हळ यांच्याजवळ कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही.

त्यामुळे त्यांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने केली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीनगर पोलीस करत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com