ठाण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात; बसखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील काजूपाडा परिसरात एका दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे बळी गेल्याची घटना घडली आहे.
Thane Accident News
Thane Accident News saam tv
Published On

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून (Thane) धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील काजूपाडा परिसरात एका दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे बळी गेल्याची घटना घडली आहे. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रोडवर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकी स्वाराच्या खड्ड्यामुळे बळी गेल्यानंतर परिसरातील लोकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातानंतर काशिमिरा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आला आहे. ( Thane News In Marathi )

Thane Accident News
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे ईडीच्या रडारवर; ED कार्यालयात ६ तास चौकशी

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील घोडबंदर रोडवर दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे तोल जाऊन हा व्यक्ती खाली पडला. त्यानंतर मागून येणाऱ्या बसच्या चाकाखाली गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे. हा अपघात ठाणे ग्रामीण परिसरात घडला असून या प्रकरणी ठाण्यातील काशिमिरा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आला आहे. अपघातात (Accident) मृत्यू झालेला व्यक्ती हा ठाण्यातील मुंब्रा येथील अमृतनगर परिसरात राहणारा आहे.

Thane Accident News
पुणे हादरलं! १७ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

मोहनीश खान असे मृत व्यक्तीचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे. त्याचं संपूर्ण कुटुंब हे उत्तर प्रदेश येथे स्थायिक आहे. मोहनीश हा इलेक्ट्रीशिअनचे काम करत होता. मोहनीशच्या मृत्यू पश्चात त्याचा मृतदेह अंतिमसंस्कार करण्यासाठी मुळगावी उत्तर प्रदेश येथे नेण्यात आला आहे, अशी माहिती मोहनीश खानचे नातेवाईक झाफर खान यांनी दिली आहे. झाफर खान यांनी काशिमिरा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून ते भिंडी बाजार, सँडहर्स्ट रोड मुंबई येथील रहिवाशी आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com