मुलीच्या वादातून दोन तरुणांमध्ये भर चौकात राडा; घटनेचा थरारक व्हिडियो व्हायरल

कल्याण आधारवाडी चौकात धक्कादायक प्रकार
Mumabi Latest News
Mumabi Latest Newsप्रदीप भणगे
Published On

मुंबई - कल्याण (Kalyan) परिसरात एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून दोघा जणांमध्ये राडा झाला. भर चौकात या दोघांमध्ये जोरदार राडा झाला. नंतर हा वाद इतक्या विकोपाला गेला, की कार चालकाने दुसऱ्या तरुणाला गाडीसोबत फरफटत नेले.

काय आहे प्रकरण?

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात सिग्नल लागला होता. वाहनचालक सिग्नल ग्रीन होण्याच्या प्रतिक्षेत होते. इतक्यात एक बाईकस्वार व्यक्ती एका कार समोर उभा राहिला आणि त्याने कारवर मारायला सुरूवात केली. काही वेळाने सिग्नल सुटला असता कार चालकाने समोर उभा असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला. याच दरम्यान वाहतुक पोलिसांनी (Police) व्हिडियोच्या आधारे कार शोधून काढत गुन्हा दाखल केला.

हे देखील पहा -

प्रवीण चौधरी अस या कारचालकाच नाव आहे. प्रवीण याचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध असल्याचे संशय त्रिवेशला आहे. नवी मुंबई येथे राहणारा प्रवीण हा या तरुणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आल्याचा संशय त्रिवेशला आल्याने त्याने प्रवीणला आधारवाडी चौकात अडवून वाद घातला. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी प्रवीण विरोधात कारवाई केली आहे. हा प्रकार खडकपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडला असून पोलीस आता यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com