Thane Borivali Tunnel Road: मागाठाणे- बोरिवली भुयारी मार्गातील अडथळा दूर; दोन तासाचं अंतर पूर्ण होईल २० मिनिटात

Thane Borivali Tunnel Road : एमएमआरडीएच्या माध्यमातून बोरिवली ते ठाणे भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहेत. या मार्गाचे काम पूर्ण झाल्याने बोरिवली ते ठाणे दोन तासाचे अंतर अवघ्या वीस मिनिटात पार होईल.
Thane Borivali Tunnel Road
Thane Borivali Tunnel Road
Published On

बहुप्रतिक्षित बोरिवली-ठाणे टनल रोड प्रोजेक्टमधील सर्वात मोठा अडथळा दूर झालाय. हा अडथळा दूर झाल्यानं ज्या प्रवासाला दोन तासांचे अंतर लागत होतं, ते अंतर अवघ्या २० मिनिटात पूर्ण होणार आहे. या मार्गात येणाऱ्या मागाठाणे येथील ८७ झोपडीधारकांना हटवण्यात यश आल्यानं या प्रोजेक्टमधील सर्वात मोठा अडथळा दूर झालाय.

ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या प्रोजेक्टमध्ये झोपडीधारकांची अडचण निर्माण झाली होती. बोरिवलीतील झोपडीधारकांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. मागाठाणे येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील झोपडीधारकांना संक्रमण शिबिराच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. रोहिणी फडतरे, उप जिल्हाधिकारी एमएमआरडीए, पंकज सोनवणे विकास अधिकारी आणि स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते संक्रमण शिबिराच्या चाव्या देण्यात आल्या.

Thane Borivali Tunnel Road
Uber Auto: ऐकलं का! उबर रिक्षा सेवेत नवा बदल; आता ऑटोचा प्रवास होणार स्वस्त

मागाठाणे ते बोरिवली भुयारी मार्गातील अडथळा दूर झाल्याने भुयारी मार्गाच्या कामाल लवकर सुरुवात होणार. पुढील आठवड्यात प्रत्यक्ष कामाला काम लवकरच सुरू होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरिवलीचं अंतर अवघ्या २० मिनिटात पार होईल. ठाणे ते बोरीवली या भुयारी मार्गासाठी १८ हजार ८३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. भारतातील हा सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग आहे.

Thane Borivali Tunnel Road
No पेपर वर्क! फक्त चेहरा दाखवला तरी बनेल तुमचं UAN; EPFOची नवी सुविधा

महायुतीच्या मागील सत्तेच्या काळात या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. या सहा पदरी दुहेरी भुयारी मार्गाची एकूण लांबी ११. ८५ किमी इतकी आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च १८ हजार ८३८ कोटी ४० लाख आहे. दरम्यान या भुयारी मार्गामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास फक्त २० मिनिटांत पूर्ण होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गाची पायाभरणी करण्यात आली होती. या दुहेरी भुयारी मार्गामुळे घोडबंदर रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होईल. या प्रकल्पाची एकूण लांबी ११.८५ किमी आहे, त्यापैकी १०.२५ किमीचा बोगदा आहे. दोन्ही बोगद्यांमध्ये दोन मार्गिका आणि एक आपत्कालीन मार्गिका असेल.

ठाणे- बोरिवली अशा मार्गावर घोडबंदरवरुन जाताना सध्या दोन तासांचा वेळ लागतो. मात्र या ठाणे - बोरिवली डायरेक्ट लिंकमुळे हा वेळ कमी होणार आहे. बोरिवली - ठाणे प्रवासासाठी घोडबंदरवरुन जाण्याचा मार्ग आहे. मीरा रोड ते ठाण्याचा पूर्व द्रुतगती महामार्ग असा हा मार्ग आहे. हा मार्ग लांब असून या मार्गावर टोलही लागतो. घोडबंदर रोडवर मोठी वाहतूककोंडी असते. पण भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com