ठाकरे सरकार 'घोटाळ्याच्या रावणाचे' अपहरण करत आहे; किरीट सोमय्या संतापले...

"घोटाळ्यांच्या पुतळ्याचे दहन” करण्यापासून रोखल्याने सोमय्या चांगलेच संतापले आहे. हा पुतळा पालिकेने ताब्यात घेतला. यावेळी त्यांची पोलिसांशीही बाचाबाची झाली.
ठाकरे सरकार 'घोटाळ्याच्या रावणाचे' अपहरण  करत आहे; किरीट सोमय्या संतापले...
ठाकरे सरकार 'घोटाळ्याच्या रावणाचे' अपहरण करत आहे; किरीट सोमय्या संतापले...सुशांत सावंत

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या आज महाराष्ट्र सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्याचे दहन करणार होते. मात्र त्याआधीच पोलीस आणि पालिकेने त्या पुतळ्यावर कारवाई केली आहे. पुतळ्याते दहन करण्यापासून रोखल्याचा सोमय्यांनी निषेध केला आहे. (Thackeray's government is abducting Ravana of scam; Kirit Somaiya got angry)

हे देखील पहा -

मुलुंड पूर्वेतील नीलम नगर येथे त्यांच्या कार्यालयाजवळ ठाकरे सरकारचा घोटाळ्याचा रावण उभारण्यात आला होता. यात गृहमंत्री पोलीस आयुक्त फरार, साई रिसॉर्ट घोटाळा, जरंडेश्वर कारखाना घोटाळा, २१०० कोटींचा कोविड हॉस्पिटल घोटाळा, रेमडेसिविर कोविड घोटाळा, ९०० कोटींचा दहिसर जमीन घोटाळा, कोल्हापूर साखर कारखाना घोटाळा, बालाजी पेपर कारखाना घोटाळा, विहंग गार्डन ठाणे घोटाळा, दापोली अनधिकृत बंगलो घोटाळा आणि पोलीस आरटीओ ट्रान्सफर घोटाळ्याचे दहन सोमय्या करणार होते. मात्र त्याआधीच पालिकेने कारवाई करत पुतळा ताब्यात घेतला आहे. यावेळी त्यांची पोलिसांशी बाचाबाचीदेखील झाली.

पुतळ्याचे दहन करण्यापासून रोखल्याचा सोमय्यांनी निषेध केला आहे. याबाबत ट्विट करत ते म्हणाले की, ''पुन्हा ठाकरे सरकारची दादागिरी. आम्ही आज ५ वाजता घोटाळ्याचा राक्षस चा पुतळा चे दहन करणार आहोत. आत्ताच 1 वाजता पोलीस आणि महापालिका अधिकारी माझा कार्यालयात येवून पुतळा ताब्यात घेत आहे.... खाजगी सोसायटी मधे , खाजगी कार्यालयात घुसून घोटाळ्याचा रावण राक्षस चे अपहरण ठाकरे सरकार करीत आहे'' असं ट्विट करत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

ठाकरे सरकार 'घोटाळ्याच्या रावणाचे' अपहरण  करत आहे; किरीट सोमय्या संतापले...
Aryan Khan Case: जेलमधून आई-वडिलांशी बोलताना आर्यन झाला इमोशनल

दरम्यान मुंबईतील षणमुखानंद हॉलमध्ये आज शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्षं लागलेलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com