Mumbai Pothole Protest: रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक; खड्ड्यात वृक्षारोपण करून पालिकेच्या कारभाराचा निषेध

Mumbai News: स्वच्छ परिसर आणि खड्डे दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महापालिका विरोधात आंदोलन करण्यात आले.
Mumbai Pothole Protest
Mumbai Pothole ProtestSaam Tv
Published On

संजय गडदे

Mumbai News Today: मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील श्रीकृष्ण नगर परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पालिकेच्या कार्यालयाची प्रतिकात्मक तिरडी काढून निषेध केला. (Latest Marathi News)

Mumbai Pothole Protest
Harshwardhan Jadhav HeartAttack News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु

स्वच्छ परिसर आणि खड्डे दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महापालिका कार्यालयात अनेकदा अर्ज व निवेदन देण्यात आले. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या या पत्रांची दखल महापालिकेच्या आर सेंट्रल कार्यालयाने दखल घेतलीच नाही. यामुळे संतापलेल्या शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर फुरसुंगी यांच्या मार्गदर्शनाखाली आज बोरिवली पूर्वेकडील श्रीकृष्ण नगरमध्ये महापालिकेविरोधात आंदोलन करण्यात आले.

मुंबईच्या (Mumbai) बोरिवली पूर्वेकडील श्रीकृष्ण नगर परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेच्या विरोधात जनअक्रोश आंदोलन उभारण्यात आले.

Mumbai Pothole Protest
Amravati DCC Bank Election: अमरावती जिल्हा बँक अध्यक्षपदी बच्चू कडू यांचा विजय; आमदार यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का

यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भर पावसात महापालिकेविरोधात रस्त्यावर उतरून प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढून महापालिकेच्या कारभाराचा निषेध केला. महापालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला यावेळी आंदोलकांनी खड्डे चुकवा रस्ता शोधा जीव वाचवा, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशा घोषणा देत महापालिकेला जाब विचारला.

यावेळी आंदोलकांनी खड्ड्यात वृक्षारोपण देखील करत महापालिकेच्या कारभाराचा निषेध केला. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे श्रीकृष्ण नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे आंदोलकांना दहिसर पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com