Kirit Somaiya: "माझा मनसुख हिरेन करायचा ठाकरे सरकारचा प्लॅन"- सोमय्यांचा गंभीर आरोप

Attack On Kirit Somaiya: या हल्ल्याबाबत मी राज्यपालांना गुरुवारी भेटणार तर, केंद्रीय गृहमंत्रालयाला रिपोर्ट देणार आणि ठाकरे सरकारचे घोटाळे काढूनच गप्प बसणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Serious allegations by bjp leader kirit somaiya on thackeray government
Serious allegations by bjp leader kirit somaiya on thackeray governmentSaam TV
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर ५ फेब्रुवारीला पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation Head Quarter) मुख्यालयाच्या आवारात शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पायऱ्यांवर पडल्याने त्यांच्या हाताला दुखापतही झाली होती. आता याच हल्ल्याबाबत सोमय्यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) गंभीर आरोप केले आहेत. "ठाकरे सरकारला माझा मनसुख हिरेन (Mansukh Hiren) करायचा प्लॅन होता, म्हणजेच माझी हत्या (Murder) करण्याचा प्लॅन होता" असा गंभीर आरोप सोमय्यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. त्याचप्रमाणे माझ्यावर हल्ला झाला तेव्हा पुणे पोलीस स्तब्ध होते असा आरोप करत, मला मोदी सरकारच्या सुरक्षा रक्षकांनी वाचवलं असंही ते म्हणाले आहेत. (thackeray government was planned to killed me serious allegations by bjp leader kirit somaiya on thackeray government)

हे देखील पहा -

किरीट सोमय्यांनी काही वेळापुर्वी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओही शेयर केला. ज्यात एका शिवसैनिकाच्या हातात दगड दिसत असून तो त्याने सोमय्या बसले होते त्या गाडीच्या दिशेने फिरकावल्याचे दिसत आहे. याबाबत सोमय्या म्हणाले की, परवाच्या पुणे घटनेचे अनेक व्हिडिओ बाहेर आलेत. दगड, काठी ज्यापद्धतीने हल्ला झाला, पण पुणे पोलीस स्तब्ध आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे, अनिल परब, पाटणकर यांचे घोटाळे बाहेर येत आहेत म्हणून किरीट सोमय्या यांना गप्प बसवायचे आहे. मला मोदी सरकारच्या सुरक्षा रक्षकांनी वाचवलं. या हल्ल्याबाबत मी राज्यपालांना गुरुवारी भेटणार तर, केंद्रीय गृहमंत्रालयाला रिपोर्ट देणार आणि ठाकरे सरकारचे घोटाळे काढूनच गप्प बसणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Serious allegations by bjp leader kirit somaiya on thackeray government
शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यांना राऊतांचे सडेतोड उत्तर म्हणाले, 'हा नालायकपणा…

दरम्यान सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 8 शिवसेना नेत्यांविरोधात पोलीसांनी एफआयआर दाखल केली असून आयपीसी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४, ३७(१), १३५ अन्वये हा गुन्हा नोंदवला गेला आहे. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भागिदार सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असला सोमय्यांवर हल्ला होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com