पुणे : TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात फेरफार झाल्याचं उघड झालं आहे, यात बडे अधिकारीच मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं असून एजंटचं रॅकेटही मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याचं स्पष्ट होतं आहे. परीक्षा परिषदेचे दोन माजी आयुक्त या प्रकरणात केंद्र स्थानी आहेत.
परीक्षा घोटाळा प्रकरणातले बडे मासे
नाव : तुकाराम सुपे
पद : आयुक्त, राज्य परीक्षा परिषद
काम : परीक्षा निकालात फेरफार करणारा मास्टरमाईंड
नाव : सुखदेव डेरे
पद : आयुक्त, राज्य परीक्षा परिषद
काम : परीक्षा निकालात फेरफार करणारा मास्टरमाईंड
ज्यांच्या निष्पक्षपणे परीक्षा घेण्याची जबाबदारी होती, ते निघालेत TET अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेच्या फेरफारीचे मास्टरमाईंड, या दोघांनीच परीक्षा घेणारी कंपनी आणि दलालांना हाताशी धरून अपात्र परिक्षार्थींचे निकाल पात्र म्हणून घोषित केले. बरं ही संख्या काही थोडीथोडकी नाही तर तब्बल पाचशेच्या घरात आहे. त्यासाठी प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये गोळा केले गेले आणि ती रक्कम पोहोचली ५ कोटींच्या घरात. जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचे प्रितेश देशमुख पोलिसांच्या गळाला लागल्यावर आधी सुपे यांचं आणि आता डेरे यांचं नाव समोर आलं आहे.
काय होती कार्यपद्धती?
- दलालांचं जाळं परिक्षार्थींपर्यंत पोहोचायचं
- दलाल सुपे आणि डेरे यांना सांगून पैसे घेतलेल्या उमेदवारांची नावे द्यायचे
- सुपे आणि डेरे संबंधित यादी GA सॉफ्टवेअरपर्यंत पोहोचवत
- GA सॉफ्टवेअर अपात्र असणाऱ्यांना पात्र करुन निकाल जाहीर केला.
गोळा झालेले पैसे सर्व आरोपींनी वाटून घेतल्याचं स्पष्ट झालं आहे, पण कोणाचा हाती वाटा किती हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
सुपे असो किंवा डेरे, या दोन्ही अधिकाऱ्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. सुपेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तर डेरेला नियमबाह्य नियुक्त्यांसाठी निलंबितही केलं होतं. मात्र त्याच वेळी जर कडक कारवाई दोघांवरही झाली असती तर TET परीक्षा घोटाळा टळू शकला असता. त्यामुळेच या दोघांनाही पाठीशी घालणारे झारीतले शुक्राचार्य नेमके कोण? याचाही शोध गरजेचा आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.