पुणे : राज्य सरकारनं नोकरभरतीसाठी घेतलेल्या परीक्षांना पेपरफुटीचं ग्रहण लागलं आहे. आरोग्यभरती परीक्षा, टीईटी, पोलिस भरती परीक्षांचे पेपर फुटले आहेत. त्यामुळे या परीक्षा रद्द करुन पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी उमेदवारांमधून होत आहे. झालेल्या परीक्षांचे पेपर फुटले होते. काही उमेदवारांनी भ्रष्ट मार्गानं प्रश्नपत्रिका मिळवल्या होत्या. त्यामुळं पेपर फुटलेल्या परीक्षांचा निकाल लावूच नये अशी मागणी होऊ लागली आहे. आरोग्य भरती परीक्षेच्या क आणि ड गटाचे पेपर फुटल्याचं आता संपूर्णपणं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं या परीक्षांचा निकाल लावणे आणि त्या आधारे नोकरभरती करणं हे लाखो तरुणांवर अन्याय करण्यासारखं आहे. नोकरभरतीतला पैशांचा बाजार रोखून पुन्हा परत परीक्षा घेण्याची मागणी आता उमेदवारांमधून होऊ लागली आहे.
साम टीव्हीचे प्रश्न
१) टीईटी, म्हाडा, आरोग्य विभाग आणि पोलिस भरतीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे समोर आले, तरीही परीक्षा रद्द का नाही?
२) ज्या परीक्षार्थींचं भवितव्य टांगणीला लागलं आहे, त्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणी सरकार ऐकणार का?
३) एमपीएससी, आयबीपीएस सारख्या शासकीय यंत्रणा असताना परीक्षांसाठी खासगी कंपन्या कशाला?
४) खासगी कंपन्यांवर कुणाचा वरदहस्त?
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.