कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; नगरसवेकाचा मृत्यू!
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; नगरसवेकाचा मृत्यू!अजय दुधाने

कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; नगरसवेकाचा मृत्यू!

रात्री उशिरा कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून उल्हासनगर महानगरपालिकेतील तरुण नगरसेवक अजित उर्फ पप्पू प्रभुनाथ गुप्ता यांचं या अपघातात निधन झालं आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत.
Published on

उल्हासनगर : रात्री उशिरा कल्याण नगर महामार्गावर दोन कार समोरासमोर येऊन भीषण अपघात घडला. या अपघातात उल्हासनगर महानगरपालिकेतील तरुण नगरसेवक अजित उर्फ पप्पू प्रभुनाथ गुप्ता यांचं अपघातात निधन झाले असून त्याच्या सोबत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

हे देखील पहा :

जखमींवर उल्हासनगर मधील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री पप्पू गुप्ता हे आपल्या मित्रांसोबत टिटवाळा येथे जात असताना, पाचवा मैल भागात हा अपघात घडला. गुप्ता यांच्या निधनाचे वृत्त रातोरात शहरात पसरताच अनेकांनी उल्हासनगर च्या मध्यवर्ती रुग्णालयात गर्दी केली होती.

कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; नगरसवेकाचा मृत्यू!
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आर्यन खानची NCB SIT कडून साडे पाच तास चौकशी!
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; नगरसवेकाचा मृत्यू!
"अंघोळ केल्यावर पाप धुवून जाईल" म्हणत 18 वर्षाच्या मुलीवर मौलवीकडून बलात्कार!

गुप्ता हे महापालिकेतील तरुण नगरसेवक होते. शिवाय सदा हसतमुख असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. या घटनेने पप्पू गुप्ता यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात या घटनेचा शोक व्यक्त केला जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com