वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आर्यन खानची NCB SIT कडून साडे पाच तास चौकशी!

काल रात्री 11.40 वाजता आर्यन खान NCB कार्यालातून बाहेर पडला. विशेष म्हणजे आज आर्यन खानचा (13 नोव्हेंबर) रोजी त्याचा वाढदिवस आहे. मात्र, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच त्याला तपास यंत्रणेला सामोरे जावे लागले.
आर्यन खान
आर्यन खान SaamTvNews
Published On

मुंबई : संपूर्ण देशभर खळबळ माजविणाऱ्या मुंबईतील कार्डिलीया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अडकलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा याचा आर्यन खान (Aryan Khan) याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईच्या कार्यालयात विशेष तपास पथकाकडून (SIT) तब्बल साडेपाच तास कसून चौकशी करण्यात आली. यावेळी तो आपल्या वकिलांसह एनसीबी कार्यालयात आला होता.

हे देखील पहा :

रात्री 11.40 वाजता आर्यन खान चौकशी व आवश्यक प्रक्रिया पार पाडून NCB कार्यालातून बाहेर पडला. विशेष म्हणजे आज आर्यन खानचा ( 13 नोव्हेंबर ) वाढदिवस आहे, आणि वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच त्याला तपास यंत्रणेला सामोरे जावे लागले. या संपूर्ण चौकशी फेऱ्यांमुळे आर्यनचा वाढदिवस यंदा साधेपणानेच साजरा केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कार्डिलिया क्रूझवर ज्या दिवशी कारवाई करण्यात आली त्या दिवशी नेमकं काय झालं या बाबतची चौकशी NCB च्या एसआयटी टिमने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आर्यन खान
Breaking : प्रक्षोभक वक्तव्य प्रकरणात राज ठाकरेंची निर्दोष सुटका!
आर्यन खान
अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चा दरम्यान दुकानांची तोडफोड! पहा Video

सध्या आर्यन खान जामिनावर बाहेर आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जवळपास महिनाभर आर्यन जेलमध्ये होता. आर्यन जरी जामिनावर बाहेर असला तरी, मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर करताना त्याला 14 अटी घालण्यात आल्या आहेत. त्यातील एक प्रमुख अट म्हणजे दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत त्याला एनसीबी कार्यालयात हजेरी लावायला सांगितले आहे. त्यानुसार काल शुक्रवारी आर्यन NCB कार्यालयात आला होता. कार्यकलायातून बाहेर पडतेवेळी आर्यन सोबत संवाद साधण्यासाठी माध्यमांची मोठी गर्दी केली होती. मात्र, यावेळी आर्यनने माध्यमांना टाळले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com