Tejaswi Ghosalkar: तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, समजूत काढण्याचा प्रयत्न? नाराजी दूर होणार का?

Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता त्या काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tejaswi Ghosalkar: तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, समजूत काढण्याचा प्रयत्न? नाराजी दूर होणार का?
Tejaswi GhosalkarSaam Tv
Published On

ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला. त्यांनी सर्व पदांचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्या असल्याचे बोलले जात आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. सर्व पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून तेजस्वी घोसाळकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तेजस्वी घोसाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मी माझे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले आहेत. त्यांच्या उत्तराची मी वाट पाहत आहे. उद्धव ठाकरेंसोबत मी बोलणं केलं आणि माझी नाराजी मी सांगितली. मला हिच अपेक्षा आहे की मला न्याय मिळावा आणि त्यांनी निर्णय लवकर घ्यावा. मला आता काहीच बोलायचे नाही. मी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाची वाट पाहत आहे. माझी नाराजी दूर झाली की नाही हे लवकरच समजेल.'

Tejaswi Ghosalkar: तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, समजूत काढण्याचा प्रयत्न? नाराजी दूर होणार का?
Maharashtra Politics: राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती होणार?परदेशवारीनंतर आता युतीची बारी? राऊतांनी दिले युतीचे संकेत

आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर मुंबईतील स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल तेजस्वी घोसाळकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. तेजस्वी घोसाळकर यांनी वारंवार नाराजी व्यक्त करून देखील पक्षाकडून योग्य तो निर्णय घेण्यात आला नाही आणि दखल घेण्यात आली नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.

Tejaswi Ghosalkar: तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, समजूत काढण्याचा प्रयत्न? नाराजी दूर होणार का?
Maharashtra Politics: पवार काका-पुतण्या एकत्र येणार? एकतेची नांदी, युतीची संधी? काका-पुतण्याची कार्यक्रमाला एकत्र हजेरी

तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आता या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर नेमका काय निर्णय घेणार तसंच ते राजीनामा मागे घेणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tejaswi Ghosalkar: तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, समजूत काढण्याचा प्रयत्न? नाराजी दूर होणार का?
Maharashtra Politics: राष्ट्रवादीची ताकद वाढणार, लवकरच सगळ्यांचं मनोमिलन; अजितदादांच्या जवळच्या नेत्याचं मोठं विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com