पुणे : माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात केलेल्या 'पेनड्राईव्ह' गोप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं होतं मात्र या प्रकरणामध्ये एक नावं सर्वात जास्त चर्चेत आलं ते म्हणजे सरकारी वकील अॅड. प्रवीन चव्हाण (Pravin Chavhan) यांच याच वकीलांना काल शिवाजी नगर पोलीस स्टेशनला (Shivaji Nagar Police Station) तेजस मोरेच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर तेजस मोरेने प्रतिक्रिया दिली आहे.
तो म्हणाला, 'प्रवीण चव्हाण एकेरी शब्दाने बोलताय जसं तेजस मोरे (Tejas More) रस्त्यावर पडलाय, प्रवीण चव्हाणांना सांगायचं की मी 2009 पासून धंद्यात आहे, माझे बँक स्टेटमेंट बघून घ्या, तू जेवढा आयुष्यात पैसा बघितला नसेल तेवढा मी पैसा बघितलाय, त्यामुळे पैशासाठी आम्ही कधीच असं काही केलेलं नाही. स्टिंग ऑपरेशन सारखे चिल्लर कामं अजिबात करणार नाही. प्रवीण चव्हाण मूर्ख माणूस आहे. त्याला काय बोलायचं याचं भान राहिलेलं नाही, माझ्याकडे जे पुरावे आहेत ते गोळा करायला 2 ते 3 दिवस लागतील, त्यानंतर पुराव्यानिशी मी समोर येणार आहे. तसंच पहिल्या दिवसापासून माझ्या घरच्यांवर दबाव टाकत आहेत, घरच्यांचं नाव घेताय, वरच्या लेव्हलला इन्कवायरी होणार आहे अशी धमकी प्रवीण चव्हाण यांच्याकडून दिली जात आहे.' असे आरोप मोरे याने केले आहेत.
पहा व्हिडीओ -
तसेच प्रवीण चव्हाण यांच्या स्टेटमेंटमध्ये तफावत आहे, माझे आणि प्रवीण चव्हाणांचे तसेच पोलिसांचे नंबर ऑफ कम्युनिकेशन आहेत ते वेळ आल्यावर समोर आणणार असल्याचंही मोरे म्हणाला आहे. मला या प्रकरणात कधीच अटक झाली नव्हती, हा गुन्हा आम्ही परस्परांविरोधात दाखल केला होता. मी 2009 पासून बिझनेस करतोय, प्रवीण चव्हाण यांनी आयुष्यात जेवढा पैसा बघितला नसेल तितका पैसा मी बघितलाय.' 80 लाखाच्या वर माझ्यावर लायबलिटी नाही.
मी चव्हाणां विरोधात FIR दाखल करणार आहे, प्रवीण चव्हाणांनी इतके षढयंत्र रचले आहे की डोक्याच्या पलीकडे आहे. माझ्यावर सुपारीचा आरोप करतात त्यांना मला विचारायचं बराटेच्या मिसेसला जेलमध्ये टाकण्याची सुपारी कोणत्या बिल्डरने दिली तुला? गिरीश महाजनांना (Girish Mahaja) मोक्का लावायची सुपारी कोणत्या राजकीय व्यक्तींनी दिली खरा सुपारीबाज कोण असं तेजस मोरेंने सरकारी वकीलांविरोधात सवाल उपस्थित केले आहेत.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.