Tata Airbus : सुभाष देसाईंच्या टक्केवारीमुळे महाराष्ट्रातून प्रकल्प गेला; भाजपचा गंभीर आरोप

'वर्षभरापूर्वीच टाटाचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला होता. सुभाष देसाई येणाऱ्या प्रत्येक उद्योजकांकडे किती टक्के मागत होते.'
Subhash Desai News
Subhash Desai NewsSaam TV
Published On

Tata Airbus Project : नागपूरमध्ये (Nagpur) होणारा टाटा एअरबस (Tata Airbus Project) प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन विरोधकांकडून भाजपसह शिंदे सरकारवर हल्लाबोल केला जात असतानाच आता भाजपकडून माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या टक्केवारीमुळे प्रकल्प राज्यातून गेल्याचा गंभीर आरोप भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला आहे.

टाटा एअरबस प्रकरणावर बोलताना लाड म्हणालेस लोकांची दिशाभूल करण्याचे काम महाविकास आघाडीकडून केलं जात आहे. वर्षभरापूर्वीच टाटाचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला होता. सुभाष देसाई येणाऱ्या प्रत्येक उद्योजकांकडे किती टक्के मागत होते, हे त्यांनी आधी सांगावं.

पाहा व्हिडीओ -

भूषण देसाई टक्केवारीसाठी दुबईमध्ये कशा बैठका घेत होते हे त्यांनी आधी सांगावं. मातोश्रीला किती टक्के पोहोचायचं हे देसाई यांच्याकडून सांगितलं जात होतं. किती पैसे घेतले कशा पद्धतीने फाईल फिरल्या याची सर्व जंत्री आमच्याकडे आहे आम्ही ते योग्य वेळी बाहेर काढू.

तसंच आम्ही पुराव्याशिवाय कधीही बोलत नाहीत आमच्याकडे आतापर्यंत अनेक गोष्टींचे पुरावे होते नवाब मलिक प्रकरणातील अनिल देशमुख यांचा प्रकरण असेल तर आम्ही ते तडीस नेलं हे देखील योग्य वेळी नेऊ असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

Subhash Desai News
Pune News: 'राष्ट्रवादी पुन्हा...' भाजपच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांच्या एन्ट्रीवर राष्ट्रवादीचं गाणं, डीजे ऑपरेटरवर गुन्हा दाखल

दरम्यान, टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असा संतप्त सवाल उपस्थित केला होता. पाटसाच्या या वक्तव्यावर आता लाड यांनी टीका केली आहे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र हा प्रश्न जयंत पाटील वीज यांनी विचारण म्हणजे महाराष्ट्रातील हास्य जत्रेचा कार्यक्रम वाटेल असं लाड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com