Pune News: 'राष्ट्रवादी पुन्हा...' भाजपच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांच्या एन्ट्रीवर राष्ट्रवादीचं गाणं, डीजे ऑपरेटरवर गुन्हा दाखल

चंद्रकांत पाटील कार्यक्रमात येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत वाजलं होतं.
Chandrakant PAtil
Chandrakant PAtilSaam Tv
Published On

पुणे : राष्ट्रवादीच (NCP) प्रचारगीत 'राष्ट्रवादी पुन्हा...' अनेक कार्यक्रमांमध्ये वाजवलं जात. अनेक खासगी कार्यक्रमांमध्येही लोक या गाण्यावर ठेका धरताना दिसतात. गाण्याची चाल थिरकायला लावणारी असल्याने पक्षाचं गाणं असलं तरी ते बरंच लोकप्रिय झालं आहे. मात्र भाजपच्या पुण्यातील एका कार्यक्रमाचा हे गाणं वाजल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे गाणं वाजवलं आहे. चंद्रकांत पाटील कार्यक्रमात येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत वाजलं होतं.मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजेवाल्याने साऊंड सिस्टीम विनापरवाना उभारली होती, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Latest News)

Chandrakant PAtil
Abdul Sattar : आदित्य ठाकरे म्हणजे 'छाेटा पप्पू', गाेधडीतून बाहेर आलेले आता बाेलू लागलेत : अब्दुल सत्तार

दिवाळीनिमित्त पुण्यातील रास्ता पेठेत असलेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमावेळी चंद्रकांत पाटील आल्यानंतर उपस्थितीत असलेल्या साऊंड सिस्टमवाल्याने अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत लावले.

Chandrakant PAtil
Twitterची मालकी इलॉन मस्क यांच्याकडे येताच CEO पराग अग्रवालांना हटवलं; दोघांमधील वाद, डीलमधील चढ-उतार... वर्षभरात काय घडलं?

यानंतर साउंड सिस्टमवाल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. साउंड सिस्टीम विनापरवाना लावण्यात आलं असं कारण देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com