टार्गेट 1 कोटी सदस्य नोंदणी काही लाखात; काँग्रेसच्या पक्ष संघटनेतील निरुत्साह उघड

महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगाना आणि कर्नाटकची कामगिरी चांगली आहे.
Congress
CongressSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई: एकीकडे पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला असताना महाराष्ट्रात काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणीमध्ये मागे पडल्याचा पाहायला मिळाला आहे. महाराष्ट्र काँग्रेस सदस्य नोंदणीसाठी दिलेले टार्गेट पूर्ण करू शकलेली नाही. याबाबत महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या (Congress) डिजीटल सदस्य नोंदणीच्या आढावा बैठकीत एच के पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रदेश काँग्रेसला मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत १ कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले होते. शेवटचा आठवडा राहिला असताना दहा लाख सदस्यांचा टप्पा देखील प्रदेश काँग्रेस पूर्ण करु शकले नाही. याबाबत दिल्लीतील हायकमांडला काय स्पष्टीकरण द्यायचे असा सवाल देखील याबैठीत एच के पाटीलांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगाना आणि कर्नाटकची कामगिरी चांगली आहे. मग महाराष्ट्रात इतका निरुत्साह का असा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला आहे. ही बाब चांगला नसल्याची खंत पाटील यांनी काँग्रेस नेत्यांसमोर बोलून दाखवली आहे. त्यामुळे एकीकडे इतर राज्यात काँग्रेस दारुण पराभव झाला असताना महाराष्ट्रातील काँग्रेस काहीच धडा घेतला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. (Assembly Election Result)

दरम्यान नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब या पाचही राज्यात काँग्रेसचा पराभव झाला आहे. पंजाब आणि गोवामध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल असे चित्र होते, परंतु भाजपाने आपली योग्यता पुन्हा सिद्ध केली आहे. पाच राज्याच्या निवडणूकांचे निकाल आल्यानंतर सोनिया गांधी यांनी पाचही राज्यातील प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा घेतला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पाच राज्यातील पराभव काँग्रेस हायकमांडला चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यांनतर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या पक्ष संघटनेतील निरुत्साह उघड झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com