Navi Mumbai News : तरुणीचा कारनं पाठलाग नंतर रिव्हॉल्वर रोखत केली शरीर सुखाची मागणी; नवी मुंबईत धक्कादायक प्रकार

Taloja Shocking News: नवी मुंबईतील तळोजा परिसरात ४० वर्षीय कुंदन नेटके यांनी बंदुकीच्या धाकाने तरुणीवर शरीर सुखाची मागणी केली. ती धाडसाने पळ काढून पोलिस ठाण्यात पोहोचली.
navi mumbai news
navi mumbai newssaam tv
Published On

नवी मुंबईतील संतापजनक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील तळोजा येथे ४० वर्षीय व्यक्तीने तरुणीवर जबरदस्ती करत बंदुकीचा धाक दाखवला आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तरुणीने प्रसंगावधान दाखवत त्या नराधमाच्या तावडीतून पळ काढत पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपी कुंदन नेटकेला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील तळोजा परिसरात २८ जून रोजी दुपारच्या सुमारास एक तरुण मुलगी मेट्रोच्या दिशेने जात असताना ४० वर्षीय आरोपी कुंदन नेटकेने याने आपल्या कारमधून तिचा पाठलाग केला.तिला वाटेत थांबवून तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे सांगून तिला जबरसदस्ती कारमध्ये बसवले. त्यानंतर त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, पीडितेने त्याला ठाम नकार दिल्यावर आरोपीने संतापून स्वतःकडे असलेली रिव्हॉल्वर काढली आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीने घाबरून न जात धाडसाने तिथून पळ काढत पोलीस स्टेशन गाठले.

navi mumbai news
Navi Mumbai News : ६ वर्षांत आई-वडिलांना गमावलं, भावाचीही आत्महत्या; एकाकी पडला, नैराश्येतून इंजिनीअरनं स्वतःला ३ वर्षे फ्लॅटमध्ये कोंडून घेतलं

तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कुंदन नेटके याच्याविरुद्ध भारतीय न्यायदंड संहिता मधील कलम ७५ (लैंगिक छळ) आणि कलम ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फूटेज, पीडितेचे जबाब, व घटनास्थळाची माहिती गोळा केली जात आहे. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

navi mumbai news
Navi Mumbai: पाकिस्तानातून आलेला ९ कोटी रुपयांचा माल जप्त, JNPT बंदरावर DRI ची मोठी कारवाई

दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेने सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करावी आणि महिलांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com